1. बातम्या

आजच निवडणूका झाल्या तर काय? राज्यात भाजपचे होणार पानिपत, धक्कादायक सर्व्हे आला समोर..

राज्यात शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपने सत्ता काबीज केली. यामुळे शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी संपणार अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली. तसेच चित्र देखील काही निवडणुकीत दिसून आले. अनेक आमदार देखील फुटीच्या मार्गावर आहेत. असे असताना आता आता एक सर्व्ह समोर आला आहे. यामध्ये मात्र वेगळंच चित्र समोर आले आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
survey elections today

survey elections today

राज्यात शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपने सत्ता काबीज केली. यामुळे शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी संपणार अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली. तसेच चित्र देखील काही निवडणुकीत दिसून आले. अनेक आमदार देखील फुटीच्या मार्गावर आहेत. असे असताना आता आता एक सर्व्ह समोर आला आहे. यामध्ये मात्र वेगळंच चित्र समोर आले आहे.

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर लोकसभेच्या आगामी निवडणुका आज झाल्या तर भाजप-शिंदे गटाला जबर धक्का बसण्याची शक्यता एका सर्वेक्षणाच्या निकालातून समोर आली आहे. यामुळे शिंदे गटाने सत्ता बदलून चूक केली की काय आता प्रश्न आता सर्वांसमोर पडला आहे.

राज्यात भाजपने 45 जागांचे टार्गेट ठेवले असताना भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता याबाबतची आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रातून यूपीएला ३० आणि एनडीएला १८ जागा मिळतील अशी शक्यता यामध्ये वर्तविण्यात आली आहे.

तुम्ही फक्त 'येस सर' म्हणायचं आणि ... ! गडकरींनी अधिकाऱ्यांना झाप झाप झापलं

महाराष्ट्र आणि बिहारमध्ये झालेल्या सत्तानाट्यानंतर इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी एक सर्व्हे केला आहे. जर लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर महाराष्ट्रातून यूपीएला ३० आणि एनडीएला फक्त १८ जागा मिळतील, असा अंदाज इंडिया टुडे सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये मांडण्यात आला आहे.

टाटाची सर्वात स्वस्त CNG कार लॉन्च, मायलेजमुळे संपणार महागड्या पेट्रोलचे टेन्शन, जाणून घ्या..

यामुळे यामध्ये शिंदे गट-भाजपला महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत धक्का बसणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे आता प्रत्यक्षात काय घडामोडी घडणार हे लवकरच समजणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनता वैतागली असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या;
काय तो पैसा, काय ते अधिकारी, एकदम ओकेच!! आयकरच्या छाप्यात इतका पैसा की रक्कम मोजायला लागले तब्बल १४ तास..
एकाच पिकात चार पिके, नवीन तंत्रज्ञानामुळे मिळणार बक्कळ पैसा..
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! लंम्पी त्वचेच्या रोगावर लस आली

English Summary: elections today? BJP win state, a shocking survey Published on: 12 August 2022, 12:22 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters