पशुपालन व्यवसायामध्ये जनावरांची प्रजननक्षमता निरोगी असणे खूप गरजेचे असते. कारण आपल्या पशुपालन व्यवसायची वाढ ही जनावरांची प्रजननक्षमता कसी आहे यावर जास्त करून अवलंबून असते. आपल्याला माहित आहे कि दुधाळ जनावरांमध्ये प्रजननक्षमता विषयी अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात. उदाहरण घ्यायचे झाले तर जनावरे वेळेवर माजावर न येणे, व्यायल्यानंतर जार न पडणे, गाय भरल्यावर गाभण न राहणे इत्यादी विकार जनावरांमध्ये दिसून येतात.
जर आपण या गोष्टींचा विचार केला तर या व्याधी खनिज पदार्थांची कमतरता तसेच जे काही आवश्यक संप्रेरके असतात त्यांची कमतरता इत्यादी अनेक कारणांमुळे दिसून येते. परंतु काही उपयुक्त वनौषधींचा वापर या व्याधींवर उपयोगी ठरतो.
नक्की वाचा:Red Kandhari: पशूपालकांचे दूध उत्पन्न वाढणार; 'लाल कंधारी' गाय 275 दिवस देते दूध
जनावरांच्या प्रजनन क्षमता उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त वनौषधी
1- अग्निशिखा-ही वनस्पती जनावरांच्या प्रजननक्षम संप्रेरकांच्या स्त्रावासाठी उत्तेजक आहे.
2- गोखरु- या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने मूत्र संस्थेवर उपयोग ठरतो. ही जी काही वनस्पती आहे या वनस्पतीच्या काटेरी असलेल्या फळांमध्ये भाकड जनावरे माजावर येण्यासाठी आवश्यक असलेले इंट्रोजीन संप्रेरकाची उत्पत्ती करण्याची क्षमता आहे.
3- पुत्रजीवा- या वनस्पतीमध्ये जे काही औषधी गुणधर्म असतात त्यामुळे जनावरांच्या गर्भ काळात आवश्यक असणाऱ्या संप्रेरकांची निर्मिती करतात व गर्भाच्या वाढीला सहकार्य करतात.
नक्की वाचा:दुभत्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; कमी खर्चात होईल जास्त नफा
4- अश्वगंधा- शुक्राणूंच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी औषधी वनस्पती म्हणजे अश्वगंधा होय. या वनस्पतीच्या वापरामुळे वीर्यातील शुक्राणूंची संख्या वाढते.
5- शतावरी- मादी व नर प्रजनन संस्थेच्या विविध रोगांवर शतावरीचा उपयोग केला जातो. जनावरांमध्ये असलेली शारीरिक दुर्बलता,विर्यातील शुक्राणूंची संख्या कमी असणे इत्यादी विकारांवर शतावरी चा उपयोग फायदेशीर ठरतो.
6- शिलाजित-शुक्राणूची दुर्बलता,मूत्रसंस्थेचे विकार इत्यादी रोगांवर ही अत्यंत औषधी वनस्पती आहे. यांच्या सेवनामुळे शुक्राणू व विर्य यामध्ये वाढ होणारे संप्रेरक जनावरास उपलब्ध होऊन त्यांची दुर्बलता कमी होते.
Share your comments