1. पशुसंवर्धन

'या' आजरामुळे घटते जनावरातील दुग्धोत्पादक्षमता

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


राज्यातील अनेक पशुपालक लंपी आजारामुळे चिंतेत पडले आहेत. राज्यातील अनेक भागात जनावरांवर लंपी आजार आला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतीतील कामे खोळंबली आहेत. लंपी  हा  त्वचा रोग  प्रामुख्याने गाई, बैल, यांना होणारा विषाणूजन्य साथाचा आजार आहे. दरम्यान या आजाराची सध्या कोणतीच लस उपलब्ध नाही. हा विषाणू शेळ्या मेंढ्यांमध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूंसी साधर्म्य असणारा आहे.  संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. 

हा विषाणूजन्य आजार असल्याने बबाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दुग्धोत्पादक्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरित परिणाम होतो. सुरुवातीस २ त३ दिवस जनावरास  बारीक  ताप जाणवतो. यानंतर जनावरांना सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधरपणपणे पाठ, पोट, पाय व जननेंद्रियाच्या भागात येतात. बाधित जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते. तोंडातील  व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास  त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरे लंगडतात. न्युमोनिया आणि श्वसनसंस्थेची लक्षणे आढळतात.

 


लंपी आजारावरील उपचार

विषाणूजन्य  असल्याने यावर खात्रीशीर उपचार होऊ शकत नाही. परंतु विषाणू जन्य आजाराची बाधा झालेल्या जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्यांना इतर जिवाणू जन्य आजाराची बाधा होण्याची दाट शक्यता असल्याने प्रितजौविके देणे आवश्यक आहे.  ताप कम करणारी औषधे,  प्रतिकारशक्तीवर्धक जीवनसत्तव अ आणि ई तसेच त्वचेवरील व्रणांसाठी  मलमाचा वापर करावा.  वेदनाशमक  आणि अॅण्टी - हिस्टँमिनिक औषधांचा पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा.  जनावरास मऊ, हिरवा चारा व मुबलक पाणी उपलब्ध करुन द्यावे. 

हे पण वाचा : चारा बीटमुळे होईल दुधाच्या उत्पादनात वाढ

तोंडातील व्रणास २ टक्के पोटॅशिअम परमॅग्रेट द्रावणाने धुऊन तोंडात  बोरोग्लीसरीन लावावे. बाधित अथवा संशयित जनावरांचा उपचार करताना किंवा रोग नमुने गोळा करताना पीपीई किटचा वापर करावा. हात धुऊन घ्यावेत.  तपासणीनंतर सर्व साहित्य निर्जंतुक करावे.  लस उपलब्ध नसल्याने लिंबाच्या पाल्याचे धुपट करावे. जेणेकरून गोठ्यांमध्ये डास आदी कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. आजाराचा प्रसार किटकांपासून होत असल्याने आपल्या गोठ्यातील  किटकाचं नियंत्रण करावे. जनावरांचा गोठा कोरडा  आणि स्वच्छ ठेवावा लागेल. गोठ्या शेजारी पाणी, शेण,मूत्र जमा होऊन चिखल होणार नाही यांची काळजी घ्यावी.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters