1. पशुसंवर्धन

दुग्धव्यवसाय करणाऱ्यांसाठी खूशखबर; चारा बीटमुळे होईल दुधाच्या उत्पादनात वाढ

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


दुष्काळी भागात आणि कमी पावसाच्या ठिकाणी गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असतो. कारण कमी पाऊस झाला तर जनावरांना उन्हाळ्यात काय खाऊ घालावे ही समस्या पशुपालकांसमोर निर्माण होत असते. कारण दुधाच्या उत्पादन कमी होत असते. दरम्यान आता अशा परिसरातील पशुपालकांना आता चिंता करण्याची गरज नाही. कारण दरम्यान राजस्थान मधील जोधपूर येथे स्थित असलेल्या केंद्रीय शुष्क क्षेत्र संशोधन संस्थेने एक नवे चार पीक विकसित केले असल्याचे वृत्त गाव कनेक्शन या वृत्त संस्थेने दिले आहे. 

दरम्यान अनेक राज्यातील शेतकऱ्यांना या पिकांविषयी माहिती संस्थेकडून दिली जात आहे. राजस्थानसह इतर राज्यातील क्षेत्रातही या पिकाचे उत्पादन चांगले आले आहे.  सेंट्रल शुष्क विभाग संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश तंवर यांच्यामते, चारा बीट दुसऱ्या चार पिकांच्या तुलनेत कमी जागेत आणि कमी वेळात अधिक उत्पादित होते. दरम्यान चारा  बीट आकार हा दुसऱ्या बीट सारखाचा दिसतो, पण याचा आकार मोठा असतो. याचे वजन हे पाच ते सहा किलो असते. ब्रिटेन, फ्रान्स, हॉलँड, न्युझीलँड या देशातील पशुपालकांमध्ये हे पीक खूप लोकप्रिय आहे. भारतातील पशुंसाठी  चारा बीट किती उपयोगी आहे, यासाठी राष्ट्रीय  डेअरी विकास बोर्ड आणि अनेक प्रदेशातील कृषी विभाग एकत्र येत काम सुरु केले आहे. चारा बीटाची लागवड ही १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरच्या दरम्यान केली जाते.

 


चार महिन्यात प्रति हेक्टर २०० टनापर्यंत याचे उत्पादन होते. खाऱ्या जमिनीत याचे उत्पादन चांगले येते. चारा बीटासाठी लागणारा खर्च हा एक रुपयांपेक्षा कमी असल्याचे कंवर यांनी माध्यमांना सांगितले आहे. चारा बीट हे दुसऱ्या चाऱ्यात मिसळून गुरांना खाऊ घातले पाहिजे. पिकांचे खोड हे छोटे -छोटे तुकडे करुन कोरड्या चाऱ्यात मिसळावे. गायी आणि म्हैशींसाठी प्रत्येक दिवशी १२ ते २० किलोचा खुराक द्यावा. तर छोट्या पशुंना ४ ते ६ किलोचा खुराक द्यावा. दरम्यान चार दिवसापुर्वी कापण्यात आलेला चारा जनावरांना देऊ नये. गायींना चारा बीट खाऊ घातल्यानंततर गायींच्या दुधाच्या उत्पादनात दहा टक्के वाढ झाल्याचे कंवर म्हणाले. एका एकर साठी दोन ते अडीच किलो बियाणे लागते. जोमोन, मोनरो, जेके कुबेर आणि जेरोनिमो हे चारा बीटचे चांगले वाण आहेत.   मध्यप्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातही या चारा पिकाचे चांगले उत्पादन आले आहे.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters