आपण बघतो की अनेक प्राणी हे आपल्याला उपयोगी पडत असतात, काही प्राणी तर शेतकऱ्यांकडे पाळीवच असतात. यामुळे त्यांचे एक वेगळेच नाते असते. आता भारतात गाढवाची संख्या कमी झाली असताना पाकिस्तानमध्ये ही संख्या वाढली आहे. पाकिस्तान आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेती आणि पशुधन यांना प्राधान्य देत आहे. चीनला गाढवांची निर्यात हा त्यातला मोठा वाटा आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार, 2021-2022 मध्ये पाकिस्तानमध्ये गाढवांची लोकसंख्या 5.7 दशलक्ष झाली आहे.
पाकिस्तानमध्ये 2019-2020 मध्ये 5.5 दशलक्ष गाढव होते आणि 2020-2021 मध्ये ही संख्या 5.6 दशलक्ष होती. गाढवांच्या संख्येच्या बाबतीत पाकिस्तान आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र ही संख्या का वाढली याचे कारण काय असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचे कारण म्हणजे चीनला गाढवाची खूप गरज आहे. चीन हा जगात गाढवांचा सर्वात मोठा प्रजनन करणारा देश असल्याचे म्हटले जाते.
त्यांचा बायोटेक उद्योग Ijiao नावाच्या चिनी औषधाचा पारंपारिक प्रकार तयार करण्यासाठी मुख्य घटक म्हणून गाढवाची कातडी वापरतो. इथून त्यांची मोठ्या प्रमाणात चीनला निर्यात केली जाते. चीनमध्ये या प्राण्याला खूप मागणी आहे. चीनमध्ये गाढवाची कातडी आणि जिलेटिनला चिनी औषधांमध्ये खूप महत्त्व दिले जाते. यामुळे याची मागणी वाढत आहे.
तब्बल 4 टर्मपासून साखर कारखाना बिनविरोध, राज्यात केलाय वेगळाच आदर्श निर्माण..
पाकिस्तानात मेंढ्या, म्हशी आणि शेळ्यांची संख्याही वाढली आहे. 2021-22 च्या आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, "देशातील आर्थिक विकास, अन्न सुरक्षा आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारने आपले लक्ष पशुधन क्षेत्रावर केंद्रित केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात देखील ही वाढ अशीच राहील, असे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो विजांपासून करा तुमचे संरक्षण, दामिनी अॅपमुळे वाचणार जीव
...तर सरपंचांना द्यावा लागणार राजीनामा! महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती
मोदींचे २ हजार घेणे येणार अंगलट, आता सातबारा उताऱ्यावरच आला बोजा..
Share your comments