1. पशुसंवर्धन

बाबो ! गाढविणीच्या दुधाला ७ हजार रुपयांचा दर; काही आहेत या दुधातील गूण

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


देशात दुध डेअरीचा व्यवसाय सर्वांना परिचित आहे.  अनेक जण दूध संकलन केंद्र सुरू करुन दुधाचा व्यवसाय करतात.  दूध म्हटलं तर  शेती व्यवसायाशी निगडित असलेला  सर्वाधिक पैसा देणारा व्यवसाय आहे. पण मुळाता गायी म्हैशीच्या दुधाला हवा तितका भाव मिळत नाही. पण जर तुम्ही गाढविणीच्या दुधाचा व्यवसाय सुरु केला तर काही दिवसातच मालामाल होणार यात शंका नाही कारण गायी म्हैशीच्या दुधापेक्षा गाढविणीच्या दुधाला अधिक भाव मिळतो. या दुधाचा दर ऐकून तुमच्या सर्वांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. गुजरातमध्ये तर गाढविणीच्या दुधाला तर चक्क  ७ हजार रुपयांचा दर मिळतो. बंगळुरू, चेन्नई शहरात १ कप दुधाची किंमत आहे २०० रूपयांपेक्षा रुपयां मिळते. मुळात गाढवाला खूप दूध येत नाही म्हणजे दुध कमी असते व त्यामुळे त्याचा पुरवठा मागणीप्रमाणे होऊ शकत नाही हेही हे दूध महाग असण्यामागचे एक कारण आहे.

गुजरात मध्ये हलारी जातीच्या गाढविणीच्या दुधाला प्रचंड मागणी आहे.  दरम्यान गाढविणीची ही जात सौराष्ट्रमध्ये आढळते. सौराष्ट्रासह जामनगर आणि द्रारका मध्येही ही जात आढळते. याच ठिकाणी गाढविणीच्या दुधाची डेअरी सुरू होणार आहे. हिसारमध्येही गाढविणीच्या दुधाची डेअरी सुरू होणार आहे. दरम्यान हलारी जाती गाढवीणही पांढऱ्या रंगाचे असते. तर उंचीने आणि शरिराने या जातीच्या गाढवीण तंदुस्त असतात. 

गाढविणीच्या दुधाचे फायदे काय आहेत

गाढविणीचे दूध हे अत्यंत औषधी मानले जाते व त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. तसेच त्यापासून अस्थमा, खोकला, थंडी या रोगांपासून आराम मिळतो. त्यामुळे तान्ह्या मुलांसाठी या दुधाला प्रचंड मागणी आहे. दरम्यान  केस आणि सौंदर्यसाठी पण ही खूप लाभकारक दूध आहे. सौंदर्य प्रसादनांसाठी या दुधाचा उपयोग केला जातो.  गाढविणीचे दूध शक्तीदायक, स्थिरता आणणारे, उष्ण, किंचित आंबट व खारट असून रुक्ष आहे. त्यात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते. सर्व प्रकारचे वातविकार, अर्धांगवात, पक्षाघात (हातपायावरून वारे जाणे) हे रोग या दुधाने बरे होतात.

देशात पहिल्यांदाच सुरू होणार गाढविणीच्या दुधाची डेअरी

 


गाढविणीच्या दुधामध्ये व्हिटॅमिन बी, बी-12 यांची मात्रा; तसेच उष्मांक जास्त आहेत. आईच्या दुधापेक्षा गाढविणीच्या दुधामध्ये 60 पटींनी जास्त व्हिटॅमिन सी आहे. गाढविणीचे दूध विषबाधेवर, तापासाठी, झटके येत असतील तर, डोळ्यांच्या रोगावर, दंतरोगावर, तसेच प्रजननसंबंधी रोगांवर गुणकारी असल्याचे नमूद केले आहे. टीबी आणि मधुमेह अशा आजारांसाठी गाढविणीचे दुध घेण्याचा सल्ला दिला जातो. या दुधामध्ये शर्करेचे प्रमाण फार कमी असते त्यामुळे मधुमेह असलेली व्यक्त या दुधाचे सेवन करू शकते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters