नवजात वासरांच्या संगोपनावेळी अशी घ्या काळजी

17 September 2020 07:03 PM


भारतामध्ये आता दुग्धव्यवसायाला चांगले दिवस येत आहेत. शेतकरी आता शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात पशुपालनाकडे वळत आहेत. पशुपालक विविध शासकीय योजना आणि उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्धव्यवसायातील प्रगतीचा आलेख उंचावत आहेत. पशुपालनातील अनेक बारीक सारीक गोष्टींचे जर बारकाईने व्यवस्थापन केले तर यामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होता येते. त्याचा एक भाग म्हणून नवजात वासरांचे संगोपन आणि व्यवस्थापन हे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे या लेखात आपण नवजात वासरांचे संगोपन कसे करायचे ते पाहू.

वासरू जन्मल्यानंतर काय काळजी घेणार 

वासरू जेव्हा जन्माला येते, तेव्हा जन्माला आल्याबरोबर लगेच त्याच्या नाका-तोंडातून चिकट द्रव्य दूर करावा. साधारणपणे गाय नैसर्गिकरित्या आपल्या नव्याने जन्मलेल्या वासराला चाटून साफ करते. त्यामुळे वासराची कातडी कोरडी आणि साफ होते. शिवाय वासराचा श्वास आणि त्याचे रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू होते. एखाद्यावेळी असं होतं की हवा थंड असते आणि गाय वासराला चाटत नाही, तेव्हा कोरड्या कापडाने वासराचे अंग पुसून स्वच्छ कोरडे करावे. त्याची छाती दाबून कृत्रिम श्‍वासोच्छ्वास द्यावा. वासराच्या शरीरापासून साधारणतः दोन ते पाच सेंटीमीटर अंतरावर नाळ बांधावी आणि लिगेचरच्या खाली एक सेंटीमीटरवर ती तोडावी. त्यानंतर त्या ठिकाणी टिंक्चर आयोडीन किंवा बोरिक अॅसिड किंवा इतर कोणतेही प्रतिजैविक, औषध लावावे. गोठ्यातील ओलसरपणा दूर करून गोठा स्वच्छ आणि कोरडा करावा.  दुसरे म्हणजे गाईचे येणारे पहिले चिकाचे दूध वासराला पिऊ द्यावे.  साधारणतः वासरू जेव्हा जन्माला येते तेव्हा एका तासाच्या आत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत असते. दूध पिण्याचा प्रयत्न करते. परंतु एखाद्यावेळी वासरू जन्मताच कमजोर येते, तेव्हा त्याला उभे राहण्यासाठी मदत करावी.

चिकाचे, पोषणयुक्त दूध पाजवा

 वासरांचे पहिले आणि सर्वात महत्वाचं अन्न म्हणजे आईचे दूध. त्यालाच आपण चिकाचे दूध म्हणतो. वासरू जन्माला आल्यानंतर साधारणतः तीन ते पाच दिवस त्याच्या आईकडून चिकाचे पोषणयुक्त दूध मिळते. त्या दुधामध्ये जंतुसंसर्गाशी सामना करणारी रोग प्रतिकारक शक्ती आणि द्रव्य तसेच पोषण कमी पडल्यास ते भरून काढणारे पदार्थदेखील असतात.  त्यामुळे वासराला चिकाचे दूध चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित पिऊ द्यावे.  तसेच वासराला पहिले तीन ते चार आठवडे दूधदेखील मिळाले पाहिजे आणि या सगळ्यानंतर नवजात वासरामध्ये पाण्यामधील स्टार्च आणि साखर पचवू शकण्याची क्षमता तयार होते.

 


वासरांना बऱ्याचदा आपण खाण्यासाठी भांड्यामध्ये खाद्य देतो, त्यामुळे वापरलेली भांडी चांगली पुसून स्वच्छ करावीत व सर्व साहित्य कोरड्या ठिकाणी ठेवावे.

हेही वाचा :  'या' आजारामुळे घटते जनावरातील दुग्धोत्पादन क्षमता 

वासरांचे विशेष खाणे (काप मिक्श्चर)

काफ मिक्श्चरमध्ये वासरांसाठी दूध किंवा इतर पातळ पदार्थांवर वाढणार्‍या पूरक पोषकद्रव्य असतात. यात मुख्यतः मक्यासारखी किंवा ओट्ससारखे धान्य असतात. साधारणपणे या मिश्रणात बार्ली, गहू किंवा ज्वारीसारखे धान्य वापरता येतात. उसापासून मिळणाऱ्या मोलॅसीसचेही प्रमाण यामध्ये दहा टक्‍क्‍यांपर्यंत ठेवता येते.  दर्जेदार मिश्र खाद्यात ८०  टक्के टीडीएन आणि २२ टक्के सिपी असते.

वासरांसाठी पाचकं अन्न (रफेज)

वासरांचे पोट साफ ठेवण्यासाठी पानांपासून किंवा शेंगा देणाऱ्या वनस्पतीपासून बनवलेले व बारिक केलेले, वाळलेले गवत उत्तम असते. दोन आठवड्यांनंतर ते दिलेले चालते. तसेच थोडे गवत, मिळालेला कडबादेखील अतिशय उपयोगी असतो. सूर्यप्रकाशात वाळवलेल्या छान हिरव्या रंगाच्या गवतापासून अ तसेच ड आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे मिळतात. सामन्यतः वासरू सुमारे १.५ ते २.२५ किलोग्राम कडबा खाते. वयानुसार अर्थातच खाण्याचे प्रमाण वाढते. सात आठवड्यांनंतर, चांगल्या रीतीने साठवलेला ओला चारा थोड्या प्रमाणात दिला तरी चालतो. मात्र ओला चारा लवकर सुरू केल्याने वासराच्या अंगावर खटे पडतात. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मका तसेच ज्वारीचा ओला चारा बरेचदा दिला जात असला तरी त्यामध्ये फारशी प्रथिनं नसतात आणि ड जीवनसत्वाचे प्रमाण ही अगदी कमी असते.

 

 

हेही वाचा : काय सांगता ! दहा म्हैशींच्या डेअरीसाठी मिळतय ७ लाख रुपयांचं कर्ज

पाण्याचे महत्व

नवजात वासरांना नेहमी स्वच्छ आणि ताजे पाणी मिळेल याकडे लक्ष पुरवणे गरजेचे असते. वासरांनी एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नये यासाठी पाण्याचे भांडे वेगळे ठेवावे. ते दुधाच्या भांड्यापासून लांबवर ठेवावे. वासराची वाढ योग्य प्रमाणात होत आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याचे वजन वेळोवेळी तपासणे गरजेचे असते. वासरांना पहिल्या तीन महिन्यात दिले जाणारे अन्न फार महत्त्वाचे असते. २५ ते ३० टक्के वासरांचा या दिवसांत चुकीचं पाणी मिळाल्याने मृत्यू होतो. गाभण गायीस विण्याच्या आधी दोन ते तीन महिने दर्जेदार चारा व पोषणद्रव्य गरजेचे असते. जन्मावेळी वासराचे वजन साधारणपणे २० ते २५ किलोग्रॅम असते. वासराला जंत होत नाहीत हे पाहणे आवश्‍यक असते. गोठ्याचा प्रत्येक कोपरा अन् कोपरा स्वच्छ व कोरडा ठेवावा आणि त्यामध्ये हवा खेळती राहावी अशी व्यवस्था करावी. वासरांच्या अंगावर थेट गार हवेचा झोत येऊ देऊ नये. त्यांना झोपण्यासाठी गवताची किंवा भुशाची गादी करावी. गोठा जर उघडयावर असेल तर त्यावर छप्पर द्यावे. तसेच कडक उन्हामुळे आतील हवा तापणार नाही याकडे लक्ष द्यावे.

वासरांचे संगोपन newborn cow calf cow calf cow calf rearing animal husbandry नवजात वासरे पशु संवर्धन
English Summary: How to take care rearing newborn cow calf

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.