काय सांगता ! दहा म्हैशींच्या डेअरीसाठी मिळतय ७ लाख रुपयांचं कर्ज

10 August 2020 01:45 PM By: भरत भास्कर जाधव


नवी दिल्ली - तुम्हाला जर डेअरीचा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी हा लेख खूप महत्वाचा आहे.  जर डेअरी सुरू करण्यासाठी आपल्याकडे भांडवल नसेल तर काही घाबरू नका, कारण तु्मच्या मदतीसाठी सरकार धावून आले असून सरकार आपणास भक्कम मदत करत आहे.  इतकेच नाहीतर सरकार देत असलेल्या कर्जावर अनुदान देखील देत आहे.  पशुपालन आणि डेअरी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने dairy entrepreneur scheme राबवत आहे. या योजनेच्या अंतर्गत दहा म्हैशींची डेअरी सुरू करण्यासाठी सरकार ७ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पशुधन विभागाच्या माध्यमातून दिले जाते. याशिवाय खुल्या वर्गातील डेअरी चालकांसाठी २५ टक्क्के अनुदान या कर्जावर मिळते. तर महिला आणि एससी वर्गातील डेअरी चालकांसाठी ३३ टक्के अनुदान या कर्जावर मिळते. पशुपालन व्यवसाय हा अधिक नफा देणारा आहे.

 


पण या व्यवसायासाठी लागणारा खर्च अधिक असल्याने अनेकजण या व्यवसायापासून दूर जात असतात. यासाठी शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळावे यासाठी सरकार ही योजना राबवत आहे. ही योजना नाबार्ड मार्फत चालवली जात आहे. यातून गावातील युवकांना रोजगार आणि दुग्ध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल. दरम्यान भारत सरकारने ही योजना १ सप्टेंबर २०१० मध्ये सुरु केली होती.  ज्या व्यक्तीला डेअरी सुरू करायची आहे त्याला फक्त १० टक्के रक्कम खर्च करावी लागणार आहे. तर ९० टक्के रक्कम सरकार खर्च करणार आहे. दरम्यान कर्ज घेणाऱ्यास मिळणारे अनुदान हे नाबार्ड मार्फत दिले जाते. हे अनुदान आपण ज्या बँकेतून कर्ज घेतले असेल त्याच बँकेत अनुदान मिळेल.

दरम्यान या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण वाणिज्यिक बँक, क्षेत्रिय बँक, राज्य सहकारी बँक, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत तपास करु शकतात. कर्जासाठी आपल्याकडील काही जमिनीचे कागदपत्र तारण ठेवावे लागतात. यासह जातीचा दाखला, ओळखपत्र, आणि प्रमाणपत्र, आणि प्रोजेक्ट बिजझनेस प्लान, आणि फोटो द्यावा लागतो.

buffalo dairies dairy business women dairy government scheme dairy entrepreneur scheme Dairy Entrepreneurship Development Scheme डेअरी उद्योग पशुपालन नाबार्ड राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक State Cooperative Agriculture and Rural Development Bank महाराष्ट्र राज्य सहकारी बँक State Cooperative Bank
English Summary: What do you say! Loan of Rs. 7 lakhs for ten buffalo dairies

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.