1. पशुधन

Jersey Canal: जर्सी गायीच्या पोटी गीर कालवडीचा जन्म; कृषी विद्यापीठाचा प्रयोग ठरला यशस्वी, जाणून घ्या

केंद्र सरकार आणि राज्य सरकार (central or state government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. विशेष म्हणजे आता राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना फायदा होईल असा प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी देखील झाला आहे.

Jersey Cow

Jersey Cow

केंद्र सरकार आणि राज्य सरकार (central or state government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. विशेष म्हणजे आता राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना फायदा होईल असा प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी देखील झाला आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून जर्सी गायीच्या (Jersey Cow) पोटी गीर जातीच्या कालवडीचा जन्म घडवून आणण्यात यश आले आहे.

या तंत्रज्ञानाच्या वापराने पहिल्याच गीर जातीच्या कालवडीचा जन्म जर्सी गायीच्या माध्यमातून राहुरी येथील गो संशोधन व विकास प्रकल्पात झाला.

Mixed Fisheries: मिश्र मत्स्यपालन तंत्राचा लावला शोध; शेतकरी यातून घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न, जाणून घ्या..

कालवडीचे वजन २२.९ किलो असून, वळूमातेचे एका जोप्याचे दूध ४,१६५ लिटर व फॅट ५ टक्के आहे, अशी माहिती भ्रूण प्रत्यारोपण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे यांनी दिली.

भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान (Embryo Transplantation Technology) म्हणजे उत्कृष्ट अनुवांशिकता असलेल्या दाता गायीपासून कृत्रिमरीत्या स्त्रीबीज मिळवून त्यांचे प्रयोगशाळेत चांगली अनुवांशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करतात. 

यानंतर तयार झालेल्या फलित अंडाची सात दिवस वाढ करून त्यापासून तयार झालेले भ्रूण हे उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता गायीमध्ये प्रस्थापित करून त्याची वाढ करणे हा आहे. यापासून उच्च दर्जाचे वासरू मिळविले जाते.

शेतकऱ्यांना 'ही' शेती ठरतेय अत्यंत फायदेशीर; कमी गुंतवणुकीत घेतायत लाखोंची कमाई

महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकऱ्यांच्या गोठ्यात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा (Embryo transplant technology) वापर करण्याची सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे आता या प्रकल्पांतर्गत सुमारे १५० पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे, अशी माहिती प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 
Ration Card: रेशन कार्ड मिळविण्यासाठी नवीन सुविधा सुरू; आता असा अर्ज करावा लागणार
आधार धारकांसाठी UIDAI ने दिली महत्वाची माहिती; काही मिनिटांत होणार मोठा फायदा, जाणून घ्या...
Electric Tractor: शेतकरी मित्रांनो देशात लाँच होणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; 'या' कंपनीने केली घोषणा

English Summary: Gir Canal Jersey Cow experiment University Agriculture successful Published on: 07 August 2022, 12:16 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters