शेतकरी आपल्या शेतीमध्ये चांगले उत्पादन घेत जोडव्यवसाय (attachment business) म्हणून दुग्धव्यवसाय (Dairying) करीत असतात. भारतात ग्रामीण भागात शेतीप्रमाणेच दुगधव्यवसायालाही मोठ्या प्रमाणात स्थान आहे.
अनेक शेतकरी जोडव्यवसाय म्हणून पशुपालन (animal husbandry) करून चांगले उत्पादन घेत असतात. अनेक शेतकरी गायी पालनाला पसंती देतात. मात्र पशुपालन करत असताना योग्य गायींच्या जातीची निवड करणे गरजेचे असते. आपण आज भरपूर दूध देणाऱ्या गाईच्या जातीविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळतोय? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव
शेतकरी गाई पाळण्यासाठी गीर गायीची प्रजाती निवडू करू शकतात. ही गाय एका दिवसात १२ लिटरपेक्षा जास्त दूध देते. गायीच्या (cow) या जातीमध्ये स्वर्ण कपिला आणि देवमणी प्रजाती सर्वोत्तम मानल्या जातात. भारतात गीर गाय ही दूध उत्पादनासाठी सर्वोत्तम मानली जाते.
गीर गायीचे (geer cow) आयुष्य १२ ते १५ वर्षे असते. ते आपल्या आयुष्यात ६ ते १२ वासरांना जन्म देते. या गायीने दररोज १२ लिटर दूध दिले तर ती ३० दिवसांत ३६० लिटर दूध देते आणि वर्षभरात सुमारे ४००० लिटर दूध देते. शेतकर्यांनी दुग्ध व्यवसाय केल्यास गीर गायीचे संगोपन करून लाखो रुपयांचा नफा कमावता येतो.
LIC च्या सरल पेन्शन योजनेत मिळणार पाहिजे तेवढी पेन्शन; फक्त 'हे' एकच काम करावे लागणार
विशेष म्हणजे गीर गाय (greer cow) गडद लाल-तपकिरी आणि चमकदार पांढऱ्या रंगाची असते. त्याचे कान लांब असतात. कपाळावर एक फुगवटा आहे. त्याच वेळी, शिंगे मागे वाकलेली असतात.
त्याचा आकार मध्यम ते मोठ्या पर्यंत बदलतो. चांगली प्रतिकारशक्ती असल्याने गीर गायी कमी आजारी पडतात. शेतकरी या गाईचे पालन करून उत्पन्न कमवू शकतात.
महत्वाच्या बातम्या
मान्सूनचा कहर! पुढील 3 ते 4 दिवस राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता
लेसर लेव्हलिंग, सरी वरंबा पद्धतींमुळे बाजरी उत्पादनात भरभराटी; जाणून घ्या प्रक्रिया
सावधान! 'या' रक्तगटाच्या लोकांना हृदयविकाराचा धोखा मोठ्या प्रमाणात असतो
Share your comments