1. कृषीपीडिया

जाणून घेऊ गव्हाचे पीक आणि जस्त यांचा परस्पर संबंध

wheat crop

wheat crop

 गहू हे भारतातील प्रमुख पीक आहे परंतु महाराष्ट्र हा गव्हाच्या सरासरी उत्पादनाच्या बाबतीत देशात खालच्या क्रमांकावर आहे.गव्हाच्या सध्या सुधारित व संकरित जाती पेरणीसाठी वापरले जातात. परंतु या जातींना अधिक अन्नद्रव्यांची गरज असते सध्या शेतकरी पिकांसाठी रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात करतात.पंजाब,हरियाणा इत्यादी राज्यांमध्ये छगन शेतीचा प्रयोग मोठ्या प्रमाणात केला जातो कधीही जमिनीमध्ये जस्ताची कमतरता आढळून आली आहे.या लेखात आपण गव्हामधील जस्ताचे महत्त्व याबद्दल माहिती घेणार आहोत.

गव्हामधील जस्ताच्या कमतरतेचे परिणाम

  • जस्ताच्या कमतरते मुळे गव्हाची पाने लहान व अरुंद होतात.
  • हरी द्रव्यांचा अभाव होऊन खालच्या बाजूच्या पानांवरील हिरवा रंग नाहीसा होतो.
  • पुढे त्या ठिकाणी रंगहीनठीपक्या मध्ये त्याचे रूपांतर होते.कालांतराने हे ठिपके मोठे होऊन ते संपूर्ण पानावर पसरतात.
  • कधी कधी या ठिपक्यांच्या ठिकाणी मृतवत असते ती निर्माण होऊन खोडावर त्याचा परिणाम होतो व त्यांची वाढ खुंटते.
  • शेंड्याची वाढ कमी होते व त्याचे पर्णगुच्छतरूपांतर होते.
  • झाडाला फुलोरा कमी येतो तसेच पीक फुलांवर येण्यास व धान्य पक्व होण्यास उशीर होतो.

गहू पिकाला होणारे जस्ताचे फायदे

 अनेक राज्यांमधील प्रयोगांती सिद्ध झाले आहे की जस्ताच्या वापरामुळे हेक्‍टरी तीन ते 19 क्विंटल पर्यंत  उत्पादन अधिक मिळते. जास्त जलधारणा असलेल्या जमिनीत जस्ताच्या कमतरतेचे लक्षणे आढळून येतात. अशा जमिनीमध्ये जर नत्र, स्फुरद आणि पालाश यासारख्या मुख्य अन्नद्रव्यांसोबत साडेबारा किलो सल्फेट वापरल्याने अधिक उत्पादन मिळते.

वरखत म्हणून जस्ताचा वापर केल्यास एक उत्पादनास चांगला प्रतिसाद मिळतो आणि गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी जस्ताचा वापर करणे आवश्‍यक आहे तसेच नव्या सुधारित जातींना जस्त ची अधिक गरज आहे.जस्ताचा सर्वसामान्य वापर हा जमिनीद्वारे झिंक सल्फेट च्या स्वरुपात केला जातो.जस्ताची मात्रा जमिनीतून द्यायची असेल तर जमिनीतील उपलब्ध साठा नुसार हेक्‍टरी 15 ते 40 किलो जस्त सल्फेटचा वापर करावा त्यामुळे पुढील पिकांना ही जस्त वापरण्याची गरज भासत नाही.

फवारणी द्वारे जस्त पिकांना देण्याची पद्धत

 पिकामध्ये जर जस्ताच्या कमतरतेचे लक्षणे आढळत असतील तर जस्त सल्फेट द्रावणाच्या रूपात वापर करून पिकांवर त्याची फवारणी करणे लाभदायक ठरते. 

एक हेक्‍टरसाठी 0.5 टक्के जस्त सल्फेट व 0.25 टक्के चुना भुकटीचे  द्रावण फवारावे म्हणजे पाच किलो जस्त सल्फेट अडीच किलो चुना बरोबर 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यासाठी 10 ते 15 लिटर पाणी एका बादलीत घेऊन त्यात अडीच किलो भाजलेल्या चुन्याची वस्त्रगाळ भुकटी टाकावी. ड्रममध्ये वस्त्राने गाळून एकजीव चुन्याची निवळी हळूहळू ओतावी. चुन्याची निवळी ड्रममध्ये वतत असताना ड्रममधील द्रावण एकजीव होण्यासाठी अधून मधून ढवळत राहावे व हे द्रावण गव्हावर फवारणीसाठी वापरावे. अशा दोन फवारणी आवश्‍यक आहेत अशा रीतीने दोन्हीपैकी एका पद्धतीने जस्ताचा वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters