1. कृषीपीडिया

शेतमजूर व शेतकरी यांच्या आर्थिक समृद्धी तील अडथळे दूर करण्यासाठी

शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण भागाची प्रगती व्हावी , आर्थिक संपन्नता यावी.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतमजूर व शेतकरी यांच्या आर्थिक समृद्धी तील अडथळे दूर करण्यासाठी

शेतमजूर व शेतकरी यांच्या आर्थिक समृद्धी तील अडथळे दूर करण्यासाठी

शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण भागाची प्रगती व्हावी , आर्थिक संपन्नता यावी. ही या देशातील सर्वच घटकांना, नागरिकांना, राज्यकर्त्यांना मान्य असून सुद्धा ती होत नाही, ही मात्र शोकांतिका आहे . त्याला कारणे सुद्धा अनेक आहेत. कारण हा प्रश्न जर मिटवायचा असता, तर या सत्तर वर्षात स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालावधीपासून तर तो कधीच मिटला असता ? परंतु या देशातील सत्ताधीशांनी आपली शक्ती अविचारी व्यवस्थेत वाढविली आहे . जातीचे भूत हे एका समाजातले नाही ,तर सर्व समाजाच्या डोक्यात घुसवले गेले आहे. आणि या जातीवरच राजकीय लोकांनी आपली पोळी शिजून घेतलेली आहे. ग्रामीण जनतेच्या आर्थिक समृद्धीसाठी जात हा मोठा अडथळा तयार झालाआहे?

जेव्हा जेव्हा शेतीमालाला भावाचा विषय येतो . शेतकरी, शेतमजूर यांच्या समृद्धीच्या आर्थिक संपन्नत्तेच्या मुद्द्यावर, शेतकरी संघटना मोर्चे काढून महामेळावा घेऊन त्यात हात घालते, व असे मुद्दे शासन दरबारी रेटून धरते.तेव्हाच महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात राजकीय थैमान सुरु होते. तेव्हा कुठे मराठा क्रांती मोर्चा निघतात, कुठे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते, तर कुठे कोपर्डी प्रकरण व बलात्काराची प्रकरणे बाहेर निघते. कधी बॉम्बस्पोट देशात होतात, कधी पाकिस्तानी चकमकी होताना दिसतात. खैरलांजी सारखे प्रकरण उसळतात, तर कुठे विद्यापीठाला,विमानतळाला किंवा एखाद्या महामार्गाला नाव देण्याचा विषय चव्हाट्यावर येतात. समाजात तेढ निर्माण करणारी विषय राजकीय लोक जाणून-बुजून वाढवितात. राज्य राज्यात आर्थिक विकास होऊ दिला जात नाही, भ्रष्टाचाराची व आर्थिक घोटाळे यांची अनेक प्रकरणे समोर येतात . देशात स्टॅम्प घोटाळे होतात, हर्षद मेहता सारखे लुटारू तयार होतात. कस्टाचा जमा झालेला पैसा, अलगद उचलून बाहेर परदेशात नेला जातो

तर हे कोणाच्या आशीर्वादाने तयार झालेत, यात किती लोकांचा चा हात आहे, हे सर्व महाराष्ट्र व केंद्र सरकार जवळ अहवाल आहेत. हे आता सर्व महाराष्ट्राला व देशाला माहीत झाले आहे. कष्टाचा, शेतकरी, शेतमजुरांचा घामाचा पैसा तिजोरीत जमा झाल्यावर या राजकीयांच्या डोक्यात थैमान सुरु होते. ही शासकीय तिजोरी लुटण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आप आपलेआराखडे, थोटांग उभे करतात .व ते कधीत्यांना संपवायचे सुद्धा नसतात.असे प्रकरण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात घडत असतात.

         राजकीय पक्षाचे भाडखाउ दलाल, व समाजातील चंचल नेते, आपली दुकानदारी चालविण्यासाठी लगेच ते तयार सुद्धा होतात. अशा विषयाला खतपाणी घालतात. समाजाची दिशाभूल करून लोकानच्या डोक्यातील विषय इतरत्र ठिकाणी नेऊन ठेवले जातात. शेती आणि शेतकऱ्यांचे विषय जेव्हा जेव्हा ऐरणीवर येतात, तेव्हा हे राजनीतिज्ञ लोकांच्या डोक्यात अनेक भूत घालून थैमान घालवतात .हा आजपर्यंतचा सरवानाचआलेला अनुभव आहे. जाती जातीत स्पिरिट वाढविण्याचे, थैमान हेच राजनीतिचे लोक घडवत असतात ? एका जातीच्या समोर, दुसरी जात तयार करून वाद वाढविणे . हे वाद सतत पाच वर्षे टिकवत राहणे यालाच राजसत्ता म्हणतात. 

            समाजात द्वेष व तेढ निर्माण करून राजनीती मध्ये असे नेते सुध्धा आपोआपच तयार होतात. त्यामुळे हे विषय न संपणारे आहेत. ग्रामीण समृद्धी लुटून शहरीकरनाचे जीवनमान जरी उंचावले गेले आहे . 

त्याला शासनाने त्याला प्राधान्यसुध्धा दिलेआहे,अशा परिस्थितीत मात्र ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर हा एकमेकावर च विसंबून राहिला. शहरातील समृद्धीमुळे कोणाचे कोणाशी लेनदेन राहिले नाही, तो स्वतंत्र होऊन जगतआहे . त्याला बाजूच्या घरात काय चालले हे सुध्धा कळत नाही व त्याला वेळ नाही. कारण हे समृद्धीचे लक्षण आहे.मग अशी समृद्धी ग्रामीण भागात सत्ताधीशांनी का नाही आणली? .शिवाजी महाराजांचे नारे देऊन खरी शिवशाही का अवतारता आली नाही ? . राजनीती च्या माध्यमासाठी जय भवानी जय शिवाजी ,म्हणून तरुण फक्त रस्त्यावर काढावे, त्यांच्या पोटात हवा भरायची ,कारण राजनीतीचा सर्वात साधा उपाय आहे. तर हेच तुम्ही डोळ्यासमोर आता बघत राहणार आहे का.? समाजाला झोपू द्यायचे नाही व जागी ठेवायचे नाही व त्यांच्या खिशात दोन पैसे वाढवू सुद्धा द्यायची नाही हे तत्वज्ञान पूढार्‍यांच्या डोक्यात ठासून भरलेले आहे. ग्रामीण जनतेच्या खिशात दोन पैसे न आल्यामुळे काही रुग्ण सेवक तयार होऊन समाजाचे नेते तयार झाले, परंतु आर्थिक धोरणाचा प्रश्न मात्र त्यांनीच बाजूला ठेवला व आपला उल्लू सिदा करन्यासाठी सर्व जातीतल्या लोकांना व सर्व समाजालाच पुन्हा घाईस आणल्या जात आहे. हे ,अजूनही समाजाला दिसले नाही काय? या सर्व विषयाचे मूळ गरिबीत आहे. व ही गरिबी हटविण्यासाठी आर्थिक धोरणाचे नियोजन हे राज्य व देश पातळीवर करण्याची गरजअसते .तर नुसता गरिबी हटाव हा नारा देऊन सुद्धा जमले नाही, फक्त हे निवडणुकांचे विषय असतात .अशी गल्फत राजकीय पक्ष अनेक जाहीरनामे देऊन करीत असतात.

स्वातंत्र्यप्राप्ती पासून या राजकीय नेत्यांचे हे तमाशे संपूर्ण भारताची जनता डोळ्याने बघत आहे. शहरात भागवत सप्ताह किंवा खेड्याच्या चारही कोपर्‍यावर जरी धार्मिक मेळावे भरविले गेले व कितीही अन्नदान उठविले तरी शासनाला त्याचा काही फरक पडत नाही.तर ते राजकीय लोकांच्या फायद्याचेच असतात. तिथे त्यांना मिरवायला भेटते. परंतु शेतकरी, शेतमजूराचे महामेळावे, आर्थिक धोरणावर जर अवलंबून असेल तेव्हा शासनाचे व इतर राजकीय लोकांचे डोळे त्या महामेळाव्या वरच असतात, त्या घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून असतात. त्यांची झोप उडाली शिवाय राहत नाही. कारण हा आर्थिक समृद्धी होणारा बदल त्यांच्या डोळ्यांनी बघितलं जात नाही का ? 

              डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि युगआत्मा शरद जोशी यांनी आर्थिक चळवळीवर आंदोलने व राजकीय पक्ष उभे केलेत. पण त्यां राजकीय पक्षचे या राजनिति ज्ञानी , एकत्र आलेल्या शक्तीचे , आर्थिक चळवळीचे ,किंवा शेतकरी संघटनांचे सुध्धा अनेक गटात विभाजन केलेत . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक धोरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा राजकीय पक्ष उभा केला होता, परंतु त्यांच्या निवृत्तीनंतर त्याला सुद्धा जातीचेच स्वरूप प्राप्त झाले .ही आजच्या समाजातली वस्तुस्थिती आहे.आजचे चित्र लोकशाहीचा उपयोग आर्थिक समृद्धीसाठी, ग्रामीण जनतेच्याउन्नती साठी नाही तर समाजात भांडणे लावण्यासाठी करावयाचा आहे. राजकारण करण्यासाठी जात हा सर्वात सोपा उपाय आहे. जनतेला लाचार व गुलाम बनवण्याचे षड्यंत्र व प्रशिक्षण जरी राजकीय पक्षांनी बंद केले, तरी या देशात समृद्धी नांदल्याशिवाय राहणार नाही? शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कलंक मिटविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. जाती जाती चे भांडण वाढविण्यात समाजाची शक्ती खर्च होऊ नये. जय हिंद .

 

 धनंजय पाटील काकडे.

   विदर्भ प्रमुख.           

 शेतकरी संघटना.९३५६७८३४१५.

English Summary: To remove barriers to economic prosperity of agricultural laborers and farmers Published on: 23 April 2022, 07:29 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters