1. कृषीपीडिया

पिकांचे किडींपासून रक्षण करण्यासाठी अशा प्रकारे करा बहुपीक लागवड, आणि वाचवा कीटकनाशकांचा खर्च

शेती मधे पिकाचं किडीपासून रक्षण करण्यासाठी बहु पिक लागवड करणं बंदच केले आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पिकांचे किडींपासून रक्षण करण्यासाठी अशा प्रकारे करा बहुपीक लागवड, आणि वाचवा कीटकनाशकांचा खर्च

पिकांचे किडींपासून रक्षण करण्यासाठी अशा प्रकारे करा बहुपीक लागवड, आणि वाचवा कीटकनाशकांचा खर्च

शेती मधे पिकाचं किडीपासून रक्षण करण्यासाठी बहु पिक लागवड करणं बंदच केले आहे.आपली पिकांची मुळे समस्या आहे कीटक व बुरशी आपन जर पिकांच नुकसान टाळण्यासाठी सापळा पीक पद्धती जर अवलंब केला तर पिकाचं किडीपासून होणार नुकसान टाळता येऊ शकते. जमिनीत होणारा बुरशी चां प्रादुर्भाव सुद्धा टाळता येऊ शकतो जसे की सुतकृमी !

सापळा पिकाची लागवड करताना त्यांची वाढ कशी करावी व त्यांना जागा किती पाहिजे त्यांचा जीवनक्रम, मुख्य पिकाबरोबर पाणी, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश याबाबतीत त्यांची होणारी स्पर्धा या गोष्टींचा प्रथम अभ्यास करावा. सापळा पिकांची लागवड ही मुख्य पिकांच्या सभोवताली करतात, याला ‘पेराॅमीटर ट्रॅप क्रॉपिंग असे म्हणतात. एखाद्या घराला सभोवताली जशी संरक्षक भिंत असते, तशीच ही पद्धत असते. सापळा पिकाच्या एक किंवा दोन ओळींनी ही भिंत तयार होते. आपल्या शेताचा आकार, मुख्य पिकाचे एकूण क्षेत्र इत्यादीवरून सापळा पिकाचे क्षेत्र ठरविता येते

आज आपन याच विषयावर सविस्तर माहिती समजुन घेणे आवश्यक आहे.सापळा पिकं पद्धती आपल्या शेता मधे असणे हे पिकासाठी महत्वाच आहे व आपन या गोष्टी अवलंब करावा!आता हा विषय समजून घेऊ.

झेंडू या वनस्पती च्या विशिष्ट सुगंधाने मावा, रसशोषक कीड पळवुन लावतो त्याच बरोबर मातीमधील निमॅटोड्स ( सुत्रकृमी ) नष्ट करतो . काकडीवर्गीय, टोमॅटो, कांदा, डाळींब व द्राक्षसारख्या फळपिकात खोडाजवळ लावावेत. मुळातुन अल्फाटेर्थिनिल स्त्राव सुटतो.नुकसानकारक किडिंना हाकलून लावतो.

सोप वनस्पती च कार्य फुलावर पेरोपजिवी किडी आकर्षित होतात, पानांना छिद्र पाडणाऱ्या अळीचा नायनाट परोपजिवींद्वारे होतो, सभोवती व मध्ये लावावीत.

‍‌‍‍‌‍‌मोहरी अनेक पिकांवरील किडींना आकर्षित करणारे महत्वाचे सापळापिक. गहू, हरभऱ्यात जरूर लावावा, अनेक परोपजिवी किडींनाही आकर्षित करते.आच्छादनात मिरचीत घ्यावी.‍‌‍‍‌‍‌‍‌ गाजर ची ओळख गाजराची फुले मोठया प्रमाणात मधमाश्या, परोपजिवी व् भक्षक किडींना आकर्षित करतात.‍‌‍‍‌‍‌मका मध्ये महत्वाचं मक्यावर परोपजिवी व भक्षक किडी निवास करतात.‍‌‍‍‌‍‌तुर या बहुवर्षीय तुरीवर परोपजिवी व भक्षक किडी टिकून राहतात. लेट्युस रोगनाशक आहे, हे

फ्युजेरियम रोगापासून पिकांचा बचाव करते, पिकांना मरीपासुन वाचवते. पाने कुजतांना जमिनीत त्यातील औषधी द्रव्ये मिसळून फ्युजेरियमचा नाश होतो. बाजरा फुलावर ट्रायकोग्रामा पासुन अळ्यांचा विनाश होतो, पक्षी बसतात व अळ्यांसारखी किडी खातात‌.कोबीवर्गीय पिके - कोबी, फ्लॉवर इत्यादी कोबीवर्गीय पिकांमध्ये मोहरी ची पीक घेऊन आपण या पिकातील चौकोनी ठिपक्‍याच्या पतंग (डायमंड बॅक मॉथ) या किडीची तीव्रता कमी करू शकतो. मोहरी मात्र मुख्य पिकापूर्वी तीन आठवडे आधी पेरावी, त्यावरील कीटक शिफारशीत कीटकनाशकाच्या फवारणीने नियंत्रित करु शकतो.घाटे अळी, सूत्रकृमी यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तुरीच्या चार ओळींनंतर ज्वारीच्या दोन ओळी असे आंतरपीक घ्यावे.झेंडूची सापळापीक म्हणून तुरीच्या शेताच्या चारही बाजूंनी लागवड करावी.उसात द्विदल (चवळी) पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास द्विदल पिकातील भक्षक उसावरील लोकरी मावा कमी करण्यास मदत करतात. उसात कांदा, लसूण, कोथिंबीर घेतल्यास खोड कीड कमी होते. भुईमूग या पिकाच्या बॉर्डर लाइनने सूर्यफुलाची सापळा पीक म्हणून लागवड केल्यास केसाळ अळी

स्पोडोप्टेरा व घाटे अळी या किडी सर्वप्रथम सूर्यफुलाची मोठी पाने व पिवळ्या रंगाच्या फुलांकडे आकर्षित होऊन अंडी घालतात. सूर्यफुलावरील अंडीपुंज प्रादुर्भावग्रस्त पाने अळ्यांसहित नष्ट करावीतसापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकावे किंवा कीटकनाशकाची फवारणी करावी. तूर सलग पेरणीसाठी तुरीच्या बियाण्यात 1 टक्का ज्वारी अथवा बाजरीचे बी मिसळून पेरणी करावी. अर्थात तुरीचे बियाणे 10 किलो असल्यास त्यात 100 ग्रॅम ज्वारी किंवा बाजरीचे बी मिसळून पेरणी करावी, त्यामुळे मित्र पक्षी आकर्षित होऊन शेंगा पोखरणाऱ्या अळीला खाऊन नष्ट करतात. सापळा पिकावरील किडींचे अंडीपुंज व किडी गोळा करून नष्ट कराव्यात. काही सापळा पिकांच्या विक्रीतून अधिकचे उत्पन्न मिळू शकते.सापळा पिका मुळे मित्रकीटकांचे व पक्ष्यांचे संवर्धन होते. पीक संरक्षणाचा खर्च कमी होतो. पिकाचे उत्पादन आणि प्रत सुधारता येते.सापळा पिकापासून अधिकचे उत्पादन घेता येते.माती व पर्यावरणाचे संवर्धन होते.

 

Save the soil all together

आपला सेवक

मिलिंद जि गोदे

milindgode111@gmail.com

शेती बलवान तर शेतकरी धनवान

English Summary: This is how to protect crops from pests by doing multi-cropping, and save on pesticides Published on: 03 April 2022, 04:16 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters