1. कृषीपीडिया

फुल शेती मध्ये झेंडू लागवड ठरते किफायतशीर; बंपर उत्पादनासाठी करा या जातींची लागवड

झेंडू आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात व संपूर्ण जगात महत्त्वाचे फुल आहे झेंडूच्या फुलाचा उपयोग दिवाळी दसऱ्याला अशा मोठ्या मोठ्या सणांना होतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
profitable veriety of marigold crop

profitable veriety of marigold crop

झेंडू आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात व संपूर्ण जगात महत्त्वाचे फुल आहे झेंडूच्या फुलाचा उपयोग दिवाळी दसऱ्याला अशा मोठ्या मोठ्या सणांना होतो.

आपण दिवाळीला व दसऱ्याला घराला तोरण बांधून झेंडूच्या फुलांचा उपयोग करतो. तसेच झेंडूच्या फुलांचा उपयोग कुंडीत लावण्यासाठी करता येतो. झेंडूचे पीक आपल्या राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते. उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळा म्हणूनच झेंडूच्या फुलांना जास्त मागणी असते. आणि झेंडूच्या फुलाला बाजार भाव लवकर मिळतो.झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचा उपयोग कॅरोटीनॉइड रसायन तयार करण्यासाठी केला जातो हे रसायन कोंबडी खतात मिसळले जाते त्यामुळे अंड्याच्या बलकाचा दर्जा सुधारतो या रंगद्रव्यामुळे ल्युटेन नावाची रसायन सुद्धा म्हटले जाते.

नक्की वाचा:दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत कर्ज, आजच आपले कार्ड बनवून घ्या..

या रसायनाचा उपयोग नैसर्गिक रंगद्रव्य म्हणून खाद्यपदार्थांना रंग देण्यासाठी तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो कर्करोगावर उपचारासाठी वापरले जाणाऱ्या औषधीमध्ये हे द्रव्य वापरले जाते भाजीपाला व कॉल पिकांमध्ये सूत्रकृमी नियंत्रणासाठी झेंडूचे मिश्र पीक घेतात.

1) झेंडू या फुल पिकाच्या जाती:

) आफ्रिकन झेंडू:- या आफ्रिकन झेंडू चे झुडपे उंच वाढतात झुडप्याला काटे असतात पावसाळी हवामानात झुडपे 100 ते 150 सें.मी.पर्यंत या आफ्रिकन झेंडू ची उंची वाढते.

 या आफ्रिकन झेंडू चा रंग पिवळा फिकट पिवळा व नारंगी असतो या प्रकारामध्ये पुढील प्रमाणे जातींचा समावेश होतो जायंट डबल, आफ्रिकन येलो, ऑरेंज ट्रेजंट, बेंगलोर लोकल इत्यादी.

) फ्रेंच झेंडू:- या प्रकारातली झेंडूची झुडपे तुम्ही असतात व झुडपा सारखी वाढतात. फुलांचा आकार लहान मध्यम असून अनेक रंगाची फुले असतात.या प्रकारातील जाती कुंडीत, बागेत, रस्त्याच्या दुतर्फा इत्यादी. झुडपांची उंची 30 ते 40 सें. मी. असते. जमिनीचा फुलांचा आकार लहान मध्यम असून झेंडूची फुले अनेक रंगाची असतात या प्रमाणे पुढील जातींचा समावेश होतो येलो बॉय, हार्मोनी बॉय, लिटील देविल इत्यादी.

  • आपण आता पाहू झेंडू या फुला पिकाची

 संकरित जाती

1) पुसा नारंगी :- पुसा नारंगी या जातीची लागवड केल्यानंतर 323 136 इतक्या दिवसानंतर पुसा नारंगी या जातीच्या झेंडू ला फुले येतात. 73 सें. मी. एवढी वाढते व वाढदेखील चांगली होते फुले नारंगी रंगाची व7 ते 8 सें. मी. व्यासाची असतात. हेक्टरी उत्पादन 35 टन मिळते.

नक्की वाचा:राज्यात या ऊस उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होऊ देऊ नका – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

2) पुसा बसंती :- या जातीस 135 ते 145 दिवसात फुले येतात झुडूप 59 सें. मी.उंचीचे चांगले वाढते फुले पिवळ्या रंगाची असून 6 ते 9 सें. मी. व्यासाची असतात प्रत्येक झुडूप सरासरी 58 झेंडू देतात कुंड्यात लागवड करण्यासाठी ही जात जास्त योग्य ठरते.

3) एम डी यु:- या जातीची झुडपे एकदम मध्यम आकाराची असतात व मध्यम उंचीचे असतात. उंची 65 सें. मी.पर्यंत वाढतात या झुडुपास सरासरी 97 पर्यंत फुले येतात व 41 ते 45टन प्रति हेक्‍टर याप्रमाणे उत्पादन मिळते. फुलांचा रंग नारंगी असतो व 7 सें. मी. व्यासाची असतात.

English Summary: this is benificial veriety of marigold for more production and profit Published on: 10 April 2022, 12:58 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters