1. पशुधन

दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत कर्ज, आजच आपले कार्ड बनवून घ्या..

आता दुग्ध व्यवसाय करण्याऱ्या शेतकऱ्यांसाठी एक योजना सरकारने आणली आहे. तुम्ही किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेअंतर्गत 2 लाख रुपये घेऊ शकता. त्यामुळे पशुसंवर्धनात तुम्हाला याची मदत होणार आहे. यामुळे ही योजना फायदेशीर ठरत आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
dairy farmars loan 2 lakh

dairy farmars loan 2 lakh

शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणावर चढउतार होत असतात. असे असताना सरकार त्यांच्यासाठी अनेक योजना आणत असते. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतो. आता दुग्ध व्यवसाय करण्याऱ्या शेतकऱ्यांसाठी एक योजना सरकारने आणली आहे. तुम्ही किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेअंतर्गत 2 लाख रुपये घेऊ शकता. त्यामुळे पशुसंवर्धनात तुम्हाला याची मदत होणार आहे. यामुळे ही योजना फायदेशीर ठरत आहे.

मोदी सरकारने 1 जून 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत डेअरी सहकारी आणि दूध उत्पादक कंपन्यांशी संबंधित पात्र दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना KCC उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आता यामध्ये या अंतर्गत 14,80,355 KCC मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा याचा फायदा होत आहे.

यासाठी आतापर्यंत 10974 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पशुसंवर्धन आणि दुग्धमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी लोकसभेत ही माहिती दिली. पशुसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी तिला पैशांची कमतरता भासू द्यायची नाही. असेही ते म्हणाले. यामुळे आता पुढील काळात देखील ही योजना अशीच सुरुच राहील.

या योजनेमध्ये दूध संघांशी संबंधित ज्या पात्र दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीच्या मोहिमेत समाविष्ट करण्यात आले नव्हते, त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. याअंतर्गत गायी, शेळ्या, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना कर्जाची सुविधा देण्यात आली. यामुळे शेळ्या, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना देखील कर्ज उपलब्ध होणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
मागेल त्याला शेततळे योजनेबाबत मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मोठा धक्का
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार पुण्यात, किंमत ऐकून वाटेल आश्चर्य, जाणून घ्या वैशिष्ट्ये
बातमी कामाची! आता शेतकऱ्यांना मिळणार भाडेतत्वावर जमिनी, जाणून घ्या सरकारची योजना

English Summary: Loan up to Rs 2 lakh for dairy farmers, make your card today. Published on: 09 April 2022, 11:49 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters