प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी 6 हजार रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते. यामधून लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना शेती (agriculture) आणि शेतीमध्ये खूप मदत होते.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हप्ते जमा झाले असून, सध्या ते 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. महितीनुसार या महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यावर 2 हजार रुपयांची रक्कम पाठवली जाणार आहे.
पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहू नये यासाठी नोंदणीनंतरही शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते आपण जाणून घेणार आहोत.
Beans Farming: बिन्स शेतीतून शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांचा निव्वळ नफा; जाणून घ्या सविस्तर
या गोष्टी शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या
फॉर्म (form) भरताना तुमचे नाव इंग्रजीत लिहा. ज्या शेतकऱ्यांचे नाव अर्जात हिंदीत आहे, त्यांनी ते इंग्रजीत करावे. अर्जातील नाव आणि बँक खात्यातील अर्जदाराचे नाव वेगळे असल्यास तुमचे पैसे अडकू शकतात. बँकेचा IFSC कोड, बँक खाते क्रमांक आणि गावाचे नाव लिहिण्यात चूक झाली तरी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत.
Green Onion: टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये हिरवा कांदा पिकवा; होईल चांगले उत्पन्न
भरलेली माहिती दुरुस्त अशी करा
१) चुका सुधारण्यासाठी प्रथम तुम्ही 'pmkisan.gov.in' या वेबसाइटवर जा. आता 'फार्मर्स कॉर्नर'चा पर्याय निवडा.
2) येथे तुम्हाला 'Aadhaar Edit' चा पर्याय दिसेल, येथे तुम्ही तुमच्या आधार क्रमांकामध्ये सुधारणा करू शकता.
3) तुमच्या बँक खाते क्रमांकामध्ये चूक झाली असेल, तर ती सुधारण्यासाठी तुम्हाला कृषी विभाग कार्यालय किंवा लेखपालशी संपर्क साधावा लागेल.
ई-केवायसी करणे गरजेचे
बऱ्याच दिवसांपासून सरकारकडून शेतकऱ्यांना ई-केवायसीची प्रक्रिया (Process of E-KYC) लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. जर तुम्ही या तारखेपूर्वी ई-केवायसी (E-KYC) केले नसेल तर तुम्ही १२व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता.
महत्वाच्या बातम्या
E Crop Inspection: 'ई पीक पाहणी' प्रक्रियेत होणार मोठा बदल; नवीन ॲप लॉन्च
Groundnut Crop: भुईमूग पिकावरील किडीचे करा असे नियंत्रण; मिळेल भरघोस उत्पन्न
Zero Budget Farming: झीरो बजेट शेतीमध्ये लाखोंचा नफा; पैसे खर्च न करता मिळणार बंपर उत्पादन
Share your comments