1. कृषीपीडिया

देशांतर्गत सेंद्रिय कापसाच्या प्रचारासाठीचे धोरण" विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय शिखर परिषद संपन्न!

"डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व सेंद्रिय शेती संशोधन संस्था स्वित्झर्लंड यांचा संयुक्त उपक्रम!

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
देशांतर्गत सेंद्रिय कापसाच्या प्रचारासाठीचे धोरण" विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय शिखर परिषद संपन्न!

देशांतर्गत सेंद्रिय कापसाच्या प्रचारासाठीचे धोरण" विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय शिखर परिषद संपन्न!

जागतिक पटलावर शेती आणि तत्सम क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध करणाऱ्या भारत देशामध्ये सेंद्रिय आणि जैविक शेतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत प्रमाणित उत्पादने उत्पादित करण्यात देशांतर्गत शेतकरी यशस्वी होत आहेत. याच पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेमध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या कापसाला असलेली मागणी लक्षात घेता देशांतर्गत सेंद्रिय कापसाच्या प्रसारासाठीचे धोरण ठरविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठाद्वारे स्विझरलँड मधील सेंद्रिय शेती संशोधन संस्था संस्थेच्या संयुक्त प्रयत्नातून एक दिवसीय राष्ट्रीय शिखर परिषदेचे आभासी माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला चे कुलगुरू डॉ विलास भाले यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या एकदिवसीय शिखर परिषदेमध्ये राजमाता विजयाराजे सिंधिया कृषि विश्वविद्यालय ग्वालीयरचे कुलगुरू डॉ. एस. के.राव, राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरचे संचालक डॉ वाय. जी.प्रसाद, सेंद्रिय शेती संशोधन संस्था, स्वित्झर्लंडच्या डॉ. मोनिका मेस्मर, डॉ. अमृतबीर रियार, डॉ. तनय जोशी, यांचेसह सी. अँड. ए फाउंडेशन स्वित्झर्लंडच्या डॉ. चारु जैन, धारवाड कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त संचालक संशोधन डॉ. एस. एस. पाटील, अखिल भारतीय कापूस संशोधन प्रकल्प,कोईम्बतूरचे प्रकल्प समन्वयक डॉ. ए. एच. प्रकाश, बायो रे असोसिएशन कसरावद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विवेक रावळ, इकोसर्ट फ्रान्सच्या प्रतिनिधी मिस रोझन, विभागीय कृषी सहसंचालक अमरावती तथा नागपूर विभाग, सर्वश्री श्री किसन मुळे व श्री रवींद्र भोसले, अकोला, परभणी व राहुरी कृषि विद्यापीठातील कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख सर्वश्री डॉ. आर.बी. घोराडे, डॉ. एच. व्ही. काळबांडे व डॉ. बी. एल. अमोलिक, राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरच्या पीक सुधारणा विभागाचे प्रमुख डॉ.बी. एन. वाघमारे, महाराष्ट्र राज्यातील अकोला, परभणी व राहुरी कृषी विद्यापीठातील वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (कापूस) सर्वश्री डॉ. एन. आर.पोटदुखे, डॉ.के. एस. बेग, डॉ. आर.एस. वाघ,

पीडिकेव्ही अकोला चे कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. बी.उंदीरवाडे, कृषी रसायन व मृद विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. संजय भोयर, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर निशांत शेंडे, खंडवा मध्य प्रदेश येथून सहभागी झालेले माजी अधिष्ठाता डॉ.पी. पी.शास्त्री, पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन चे प्रकल्प संचालक श्री संतोष आळसे, उपसंचालक श्री.अरिफ शहा, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, राहुरी तथा परभणी चे विभाग प्रमुख डॉ.उल्हास सुर्वे व डॉ. आनंद गोरे, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, वनविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.ययाति तायडे, कृषी विद्या विभागाचे प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार, सहयोगी अधिष्‍ठाता शिक्षण डॉ. नितीन कोष्टी, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील शास्त्रज्ञ सर्वश्री डॉ. योगेश इंगळे, डॉ. नीरज सातपुते, डॉ. ज्ञानेश्वर माळी, डॉ. प्रशांत जोशी, डॉ.किशोर बिडवे, डॉ.परिक्षित शिंगरूप, सहयोगी श्री अनंत परिहार, श्री अमोल हरणे,शैलेंद्र रावत,शंकर परिहार यांचेसह चेतना ऑर्गानिक, प्रतिभा सिंटेक्स,कॉटन कनेक्ट, ॲक्शन फॉर सोशियल ऍडव्हान्समेंट, सी एस ए,बायोरे आदी संस्थांचे प्रतिनिधी परिषदेदरम्यान चर्चेत सहभागी होते. शिखर परिषदेचे प्रास्ताविक करताना सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉक्टर आदिनाथ पसलावार यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका सविस्तरपणे विषद केली.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वच मान्यवरांनी सेंद्रिय पद्धतीद्वारे पिकविण्यात येणाऱ्या विविध पिकांसाठी सेंद्रिय पदार्थावर आधारित लागवड पद्धती विकसित करण्याकरिता प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले. कापूस पिकाचे महत्व लक्षात घेता विद्यापीठे , शासकीय संस्था , निमशासकीय संस्था , आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या संस्था आणि खाजगी संस्था यांचे माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या कापसासाठी एकत्रित प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक असल्याने त्यासाठी धोरण निश्चित करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.

परिषदेच्या दुसऱ्या सत्रात “सेंद्रिय पद्धतीद्वारे कापूस वाण विकसित करण्यासाठी मसुदा” तयार करण्याच्या दृष्टीने डॉ एन आर पोटदुखे , वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ यांनी सादरीकरण केले, सदर विषयाच्या दृष्टीने पारंपारिक पद्धतीने कापूस वाण विकसित करण्यासाठीची प्रक्रिया उपलब्ध आहे, परंतु सेंद्रिय पद्धतीने कापूस वाण विकसित करण्याच्या दृष्टीने वेगळी पद्धती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर समिती गठीत करून मान्यता प्राप्त करण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे विषद करण्यात आले .

परिषदेच्या दुसऱ्या सत्रात सेंद्रिय शेती संशोधन संस्था, स्वित्झर्लंडच्या आंतरराष्ट्रीय सहकारिता विभागाचे उपसंचालक डॉ अम्रितबीर रियार यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सेंद्रिय कापूस पिकाची असलेली सध्यस्थिती , संधी आणि असलेल्या अडचणी या विषयावर सादरीकरण केले. भारत देशामध्ये उपलब्द्ध असलेल्या कापूस पिकाच्या विविध वाणांचा विचार केल्यास, अनेक वाण हे सेंद्रिय शेती पद्धतीद्वारे विकसित करता येण्यासाठि संधी उपलब्द्ध आहेत. देशी कापूस वाणाची गुणवत्ता , लांब धाग्याचे प्रमाण आणि स्थानिक वातावरण यांचेशी जुळवून घेण्याची क्षमता असल्याने सदर वाणांचा अवलंब सेंद्रिय शेतीमध्ये उत्तम रित्या करता येण्य्सारखा आहे असे नमूद केले. सेंद्रिय पद्धतीद्वारे लागवड करण्यात येणाऱ्या कापूस पिकासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली बाजारपेठ उपलब्द्ध असल्याने सदर कापूस वाणांचा प्रसारासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे यावर सुद्धा प्रकाशझोत टाकला. 

परिषदेच्या तिसऱ्या सत्रामध्ये सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला चे मुख्य संशोधक तथा कृषी विद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ आदिनाथ पसलावार यांनी विद्यापीठ्द्वारे सेंद्रिय शेतीच्या विकासासाठी घेण्यात आलेले विविध उपक्रम तसेच विविध पिकासाठी सेंद्रिय लागवड पद्धती आणि आवश्यक उपाययोजना या विषयावर सादरीकरण केले. त्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करताना शेतीमध्ये असलेल्या विविध नैसर्गिक स्त्रोतांचा वैज्ञानिक दृष्टीने उपयोग केल्यास तसेच शेतातील उपलब्ध स्त्रोतांचे मुल्यवर्धन करून अन्नद्रव्य व्यवस्थापन, विविध सेंद्रिय किडनाशके, बुरशीनाशके यांचा एकीकृत उपयोग केल्यास पिकांची उत्तम गुणवत्ता, उत्पादकता आणि मातीचे आरोग्य अत्यंत चांगल्या प्रकारे जपता येणे शक्य असल्याचे नमूद केले . 

प्रत्येकच सत्रामध्ये सहभागी झालेल्या देशभरातील तज्ञांनी विविध सत्रामध्ये आपली मते मांडली आणि सेंद्रिय शेती पद्धतीद्वारे पीक उत्पादनासाठी चालना देण्याच्या दृष्टीने एकत्रित कार्य करण्याची गरज व्यक्त केली. जागतिक स्तरावर सेंद्रिय उत्पादनांना असलेले महत्व , निर्यात क्षमता , परकीय चलन प्राप्त करण्यासाठी असलेल्या संधी यांचा एकत्रित विचार केल्यास देशपातळीवर कृषी विद्यापीठे , राष्ट्रीय संशोधन संस्था , शासकीय संस्था , निमशासकीय संस्था , खाजगी संस्था आणि अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्था यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती आणि त्याद्वारे उत्पादित होणारे उत्पादने यांना जागतिक दर्जाचे वलय निर्माण करण्यासाठी समन्वय ठेऊन कार्य करणे आवश्यक असल्याचे विषद केले 

परिषदेमध्ये सेंद्रिय पद्धतीद्वारे कापूस वाण विकसित करण्यासाठी प्रक्रिया तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर समिती गठीत करणे, विविध पिकांच्या लागवडीकरिता सेंद्रिय पद्धती विकसित करणे, सेंद्रिय पद्धतीद्वारे उत्पादित उत्पादने यांना जागतिक बाजारपेठ उपलब्द्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, सेंद्रिय पद्धतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध घटकांची गुणवत्ता तपासणे , सेंद्रिय उत्पादनांच्या प्रमाणीकरण यासाठी मसुदा तयार करणे या सारख्या विविध बाबीसाठी धोरण nisachit करण्याचे ठरविण्यात आले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्पाचे सह शास्त्रज्ञ आणि सहायक प्राध्यापक मृद विज्ञान डॉ नितीन कोंडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ एस बी देशमुख, कनिष्ठ कापूस पैदासकार आणि प्रकल्पाचे सह शास्त्रज्ञ यांनी केले.

English Summary: One-day National Summit on "Policy for Promotion of Domestic Organic Cotton" Concluded! Published on: 16 February 2022, 04:50 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters