1. कृषीपीडिया

शेतकरी यांना के व्ही के तंत्रज्ञानाची साथ

मंडळी आपल्या शेतकरी हितासाठी व विस्ताराच कार्य करणारी यंत्रणा म्हणजे आमचं के व्ही के घातखेड आधुनिक तंत्रज्ञानाची सांगळ घालून

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतकरी यांना के व्ही के तंत्रज्ञानाची साथ

शेतकरी यांना के व्ही के तंत्रज्ञानाची साथ

मंडळी आपल्या शेतकरी हितासाठी व विस्ताराच कार्य करणारी यंत्रणा म्हणजे आमचं के व्ही के घातखेड आधुनिक तंत्रज्ञानाची सांगळ घालून शेतीविषयक माहिती प्रधान करणारी यंत्रणा होय!

 सर्वांना माहीत असेल नसेल पण माझ्या माहितीप्रमाणे आपले कृषी विज्ञान केंद्र घातखेड हे कृषीवर आधारित असेच शेती विस्ताराच केंद्र आहे.उद्धीष्ट एकच शेतकऱ्यांना शेतीविषयी नवीन माहिती मिळवून देणे हे आहे. सामान्यतः कृषी विज्ञान केंद्र भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि कृषी विद्यापीठांशी संबंधित असतात.

 सोप्या भाषेत सांगायचे तर, कृषी विज्ञान केंद्र हे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतीशी संबंधित रोजगाराशी निगडित लोकांसाठी ज्ञानाचे भांडार आहे. 

शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच काम करत असताना शेती साठी मार्गदर्शन सुद्धा करतात. आपल्या जिल्ह्यातील शेतीसाठी अनुकूल हवामानाची माहिती उपलब्ध करून देणे.त्याच बरोबर नवं नवीन तंत्र शेतकऱ्यांना कसे पोहचलं यांची जाण ठेवणारे कृषी समन्वयक कळसकर सर यांची भुमिका महत्वाची आहे व माती परीक्षण अहवाल आणि पाणी परीक्षण अहवाल या गोष्टी वर जास्त भर देण्याच काम करतात व सुविधा पोचविण्यासाठी आमच्या के व्ही के चे नाव या साठी घेतले जाते विशेष म्हणजे तेथील कृषी विस्तार च कार्य श्री प्रमोद जी मेंढे सर, श्री अमर तायडे सर, राठोड सर.पाचकवडे सर हे आपल्या 

 शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्याच शेतात सोडवण्यासाठी कटीबद्ध आहे.सुरुवातीला प्रशिक्षण केंद्र म्हणून काम करणारे के व्ही के आज चाचणी, प्रात्यक्षिक, प्रशिक्षण, तंत्रज्ञानाचा प्रसार याशिवाय अनेक कार्यक्रम आयोजित करण्याचे यशस्वी काम करत आहे. के व्ही के हे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणालीचा अविभाज्य भाग आहेत. कृषी तंत्रज्ञानासाठी ज्ञान आणि संसाधन केंद्र म्हणून काम करणे. 

तंत्रज्ञान मूल्यमापन, संशोधन आणि प्रात्यक्षिकांद्वारे कृषी आणि संबंधित शाखांमधील स्थान विशिष्ट तंत्रज्ञानच मूल्यांकन करणे हा मुख्य उद्देश आहे. शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी, कृषी विज्ञान केंद्र प्रामुख्याने विविध शेती प्रणाली अंतर्गत कृषी तंत्रज्ञानाच्या स्थान विशिष्टतेचे मूल्यांकन करण्यासाठी शेतावर चाचण्या घेतात.शेतकऱ्यांच्या शेतात तंत्रज्ञानाची उत्पादन क्षमता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम श्रेणी प्रात्यक्षिके आयोजित करणे.

त्याच बरोबर स्वयंरोजगारासाठी कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी गृहविज्ञान संबंधित प्रशिक्षण त्या बरोबर रायझोबियम पिएसबी यांचे बनवीण्याच प्रशिक्षण,शेतकरी मेळावा, चर्चासत्र, कृषी प्रदर्शन इत्यादीद्वारे कृषी विज्ञान केंद्र घातखेड हे तंत्रज्ञानाची माहिती पुरवली जाते.शेतकऱ्यांना देण्याची शेती सुविधा जसे किट संबंध व पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी मदत केली जाते.

आपले कृषी विज्ञान केंद्र घातखेड यांचा मुख्य उद्देशशेतकऱ्यांना शेतीबाबत योग्य सल्ला देण व त्याच बरोबर शिवारातील गावकऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देणे

 कृषी उत्पादन वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान योग्य सल्ला दिला जातो.शेतातच शेतकऱ्यांना बांधावर प्रशिक्षण उपलब्ध करून दिली जाते.शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान शुल्क न घेता उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आहे

 कृषी प्रदर्शन, गटचर्चा इत्यादी आयोजित व शेतकरी यांचा उत्साह वाढला पाहिजे या दृष्टीने शेतकरी यांना पुरस्कार देऊन गौरविण्याचे काम सुद्धा करतात . आपल्या भल्यासाठी शेतकरी बांधवांनो, ही कृषी विज्ञान केंद्र घातखेड तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत व भविष्यात सुद्धा राहील.तुम्हाला शेती किंवा ग्रामीण व्यवसायाशी संबंधित कोणतीही माहिती हवी असल्यास तुम्ही आपल्या जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रा घातखेड अमरावती यांच्या सोबत संपर्क साधावा.

 

Save the soil all together

मिलिंद जि गोदे

9423361185

शेती बलवान तर शेतकरी धनवान

English Summary: Farmer to with kvk technology friendship Published on: 07 April 2022, 10:16 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters