1. कृषीपीडिया

कौतुकास्पद! तब्बल 250 एकरवर गवती चहाची लागवड; 80 शेतकरी घेत आहेत लाखों रुपयांमध्ये उत्पन्न

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिकांची शेती करून चांगले उत्पादन घेत असतात. सध्या आपण पाहिले तर बरेच शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत नैसर्गिक शेती करत आहेत. आज आपण अशाच शेतकऱ्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
farmers

farmers

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिकांची शेती करून चांगले उत्पादन घेत असतात. सध्या आपण पाहिले तर बरेच शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत नैसर्गिक शेती (Natural farming) करत आहेत. आज आपण अशाच शेतकऱ्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

पारंपरिक शेतीला फाटा देत नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील 80 शेतकऱ्यांनी एकत्र येत गवती चहाची लागवड केली आणि यांचा हा लागवडीचा यशस्वी प्रयोग ठरला आहे.

शहादा तालुक्यातील 80 शेतकऱ्यांनी करार शेती (Contract farming) करत 250 एकर क्षेत्रावर गवती चहाची लागवड केली आहे. येथील शेतकरी या शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पादन घेत आहेत.

आपण पाहिले तर नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्यांना पारंपारिक शेती परवडत नाही. त्यामुळे याला पर्याय काय असा विचार करत शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील किशोर देविदास पाटील यांनी पर्यायांचा शोध घेतला. यांना पर्याय म्हणून लेमन ग्रास समोर आला.

या शेतकऱ्याने गवती चहा पिकाबद्दल योग्य ती माहिती घेतल्यानंतर डेहराडून येथून लेमन ग्रासची रोपे मागवून त्याची लागवड केली. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील काँटो ऍग्रो वर्ल्ड प्रा. (Kanto Agro World Pvt) या कंपनीसोबत करार केला. त्यांच्या शेतातील लेमन ग्रास कंपनी खरेदी करुन त्यावर प्रक्रिया करुन त्यापासून सुगंधी तेल तयार करत आहे.

पाऊस पुढचे काही दिवस विश्रांती घेणार; मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पिकांचे करा असे नियोजन

गवती चहा लागवडीला सर्वात कमी पाणी लागते

शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन फूट बाय एक फूट या अंतरावर गवती चहा रोपांची लागवड केली. एक एकर क्षेत्रासाठी जवळपास 22 हजार रोपे लागतात. त्यासाठी या शेतकऱ्यांना 60 हजार रुपयांचा खर्च आला.

विशेष म्हणजे गवती पिकाला कमी पाणी लागते. महत्वाचे म्हणजे किशोर पाटील यांच्याप्रमाणेच तया भागातील 80 शेतकऱ्यांनी लेमन ग्रासची 250 एकर क्षेत्रावर लागवड केली आहे.

डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोलसाठी 'या' फळाचे सेवन करावे; ठरेल फायद्याचे..

एकदाच लागवड करून 6 वर्ष घ्या कमाई

शेतकरी गवती चहाची एक वेळेस लागवड (cultivation) करून सलग 6 वर्ष उत्पन्न घेऊ शकतात. गवती चहापासून तयार करण्यात आलेल्या सुगंधी तेलाला देशात आणि विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळं या शेतीला शेतकरी खूप महत्व देत आहेत. पारंपरिक शेतीला (Traditional farming) पर्याय म्हणून शहादा तालुक्यात लेमन ग्रासची शेती शेतकरी करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या 
उडीद उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन! उडीदाला मिळतोय 10 हजारांवर बाजारभाव
26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भात यलो अलर्ट जारी
कुंडलीत चक्र आणि समुद्र योग असणारे लोक जगतात राजासारखे जीवन; तुमच्या कुंडलीत आहे?

English Summary: Experiment successful 250 acres grass tea cultivation 80 farmers Published on: 25 September 2022, 11:23 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters