1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांनो पारंपरिक शेती सोडा आणि करा जेरेनियमची लागवड; डोळे झाकून कमवा ५ लाख

जेरेनियम (Geranium) ही एक सुगंधी आणि वनौषधीयुक्त झाडीदार बारमाही वनस्पती असून जेरेनियम च्या एकूण ४२२ प्रजाती आढळतात ज्यांना सामान्यतः क्रॅन्सबिल म्हणून ओळखले जाते. जेरेनियमची लागवड मुख्यतः व्यावसायिकरित्या आवश्यक असलेल्या तेलासाठी केली जाते.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Geranium

Geranium

जेरेनियम (Geranium) ही एक सुगंधी आणि वनौषधीयुक्त झाडीदार बारमाही वनस्पती असून जेरेनियम च्या एकूण ४२२ प्रजाती आढळतात ज्यांना सामान्यतः क्रॅन्सबिल म्हणून ओळखले जाते. जेरेनियमची लागवड मुख्यतः व्यावसायिकरित्या आवश्यक असलेल्या तेलासाठी केली जाते. ही वनस्पती गरीब माणसाचा 'गुलाब' म्हणूनही ओळखला जाते.

या वनस्पतीच्या पानांमधून, देठातुन आणि फ़ुलातुन काढलेल्या तेलाचे आरोग्यास उत्कृष्ट फायदे असल्या कारणाने या तेलांचा उपयोग हा आयुर्वेदिक उपचारा मध्ये केला जातो. या वनस्पतीचे देठ हे दंडगोलाकार, पायथ्याशी लाकडासारखे कडक असते. सुरुवातीला हे हिरवे आणि वयानुसार तपकिरी होत जाते. या वनस्पतीची पाने अत्यंत सुगंधी असतात. तसेच या वनस्पतीच्या पानांना/फुलांना उग्र गुलाबासारखा गंध असतो म्हणून या वनस्पतीला ‘जेरेनियम गुलाब’ म्हणून देखील ओळखले जाते. व्यावसायिक दृष्ट्या जेरेनियम ची लागवड ही शेतकर्ऱ्यांसाठी फायदेशीर ठरु शकते.

जेरेनियम तेलाचे फायदे: Benefits of Geranium Oil

1. जेरेनियमचे तेल हे तुरट असुन त्याचा उपयोग सुरकुत्या कमी करण्यात मदत करते.
2. जेरेनियमच्या तेलात लघवीचे प्रमाण वाढवणारा गुणधर्म आहे, लघवी वाढल्यामुळे विषारी घटक बाहेर पडन्यास मदत करते.
3. जेरेनियमचे तेल हे फुलांच्या आणि पुदीन्याच्या सुगंधच्या तुलनेत अतिशय सुगंधित तेल आहे.
4. जेरेनियमचे तेल हे मुरुम, पुरळ आणि इतर त्वचारोगाच्या उपचारास होतो.
5. जेरेनियमचे तेल तणाव आणि नैराश्य कमी करण्यास मदत करते.
6. जेरेनियमच्या तेलात सुजन आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे जखम भरण्यास मदत करते.
7. जेरेनियमचे तेल एक उत्तम कीटक निरोधक असुन कीड/कीटक चाव्याचा उपचार करणारा म्हणून काम करतो.
8. जेरेनियमचे तेल श्वसन संक्रमणापासून बचाव करण्यास मदत करते.
9. जेरेनियमचे तेल दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
10. जेरेनियमचे तेल रजोनिवृत्तीच्या (menopause) प्रभावापासून मुक्त होण्यास मदत करते.
11. जेरेनियमचे तेल हे हार्मोनल संतुलनासाठी चांगले मानले जाते.
12. जेरेनियमचे तेल रक्तदाब कमी करण्यास सुद्धा मदत करते.

अतिवृष्टि आणि मुसळधार पाऊसामुळे पिकाची मुळे कुजण्यासारखे अनेक रोग होतात आणि त्यामुळे उत्पादनात घट होते. उप-उष्णकटिबंधीय प्रदेशात लागवडीसाठी आदर्श तापमान ६°C ते २४°C असते. तथापि, हे पीक कमी उंचीवर आणि बागायती लागवडीखालील मैदानी भागात ४२°C तापमाना पर्यंत टिकू शकते.


माती: जेरेनियम पीकाला सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध, पाण्याचा निचरा होणारी आणि सच्छिद्र मातीची आवश्यकता असते. हे पीक उथळ-मुळांचे पीक असुन ५.५ ते ७.० सामू असणाऱ्या लाल-लॅटरिटिक मातीत चांगले वाढत असले तरी सच्छिद्र माती ही कॅल्शियम समृद्ध असणे आवश्यक आहे.

प्रसार, लागवड आणि अंतर

या प्रजातींमध्ये बियाणे तयार होत नसल्या कारणाने, सामान्यतः जेरेनियमची लागवड आणि प्रसार कलम कटिंग द्वारे केला जातो. निरोगी वनस्पती पासून किमान २0 सेमी लांबीची ७ ते८ कांड्या असलेली ठराविक कलम ही सर्वोत्तम लागवड साहित्य देते. वरून पहिली ५ ते ५ पाने वगळता बाकीचे रोप हे सुव्यवस्थित करावे, आणि सहाव्या ते सातव्या कांडी खाली (तीक्ष्ण चाकूने) तिरकस कापावे.

नंतर ते १० ते ३० सेकंदांपर्यंत ०.१ % बेनलेट द्रावणात (Benlate solution) बुडवावे. या प्रक्रिया केलेल्या कलमांची लागवड रोपवाटिका वाफ्यांमध्ये ५ ते ६ सेमी अंतर ठेवून करावी. या कलमांना योग्य सावली खाली दिवसातून दोनदा पाणी द्यावे. रोपवाटिकेत लागवड केल्यानंतर २ महिन्यांनी ही कलम शेतात लावण्यासाठी तयार होते (तथापि, धुक्याच्या परिस्थितीत कलमांची मुळे पूर्णपने विकसित होण्या करता सुमारे २० दिवसांचा कालावधि लागतो).

रुजलेली (कलम) कटिंगवर ०.१ % बेनलेट द्रावणाने उपचार करावे आणि ताबडतोब शेतात ६० सेमी x ६० सेमी अंतरावर पुनर्लावणी करावी. पावसावर आधारित पीक असल्यास लागवड पहिल्या पावसाळ्यानंतर करावी. १ एकर जमिनीसाठी लागणाऱ्या कलमांची संख्या सुमारे १०,००० आणि १ हेक्टर जमीन साठी सुमारे २५,००० आहे.

काढणी: जेरेनियम पीक हे लावणीनंतर सुमारे ४ महिन्यांनी कापणीच्या अवस्थेत पोहोचते. आपण या वनस्पतींची परिपक्वता कशी ठरवू शकतो? जेव्हा पाने हलकी हिरवी होऊ लागतात आणि लिंबासारख्या गंधातून गुलाबाच्या गंधात बदल होतो. काढणीच्या वेळी पानेदार देठ धारदार विळा वापरून काढणी केले पाहिजे, काढणी पूर्ण होताच शक्य तितक्या लवकर काढणीला ऊर्धपातनसाठी न्यायला हवे. जेरेनियम पीक हे बारमाही आहे म्हणून सुमारे 3 ते 8 वर्षा पर्यंत चांगले पीक देऊ शकते. एका वर्षात किमान 3 कापणी अपेक्षित असते.

उत्पन्न: पिकाचे उत्पन्न अनेक घटकांवर अवलंबून असते जसे की माती, हवामान, वनस्पतीची जात आणि व्यवस्थापन पद्धती. एका कटिंगमध्ये या पिकात १०० किलो/हेक्टर तेल अपेक्षित असते आणि जास्तीत जास्त तीन कटिंग्समधे २५० किलो/हेक्टर तेल उत्पादन मिळवता येते.

विक्री: जेरेनियम तेलाची विक्री किंमत भारतात सुमारे ८५० ते १००० रु. प्रति किलो असून. व्यवस्थित नियोजन केले असता, उत्कृष्ट लाभ मिळण्याची मोठी संधी आहे. अंदाजे १ हेक्टर पिकासाठी सुमारे १० वर्षांसाठी ४५,००० रु खर्च येतो. जेरेनियमच्या १०० किलो तेलापासून सरासरी एकूण ८,५०,००० ते १०,००,००० रु./वर्ष उत्पन्न मिळु शकते.

लेखक : प्रा. डॉ. के. आर. जाधव, प्रा. पी. एच. जंजाळ आणि प्रा.डॉ. एम. एम. देसाई
एम जी एम कृषी जैवतंतज्ञान महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद.

English Summary: Farmers abandon traditional farming and cultivate geranium Published on: 24 February 2022, 12:23 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters