1. इतर बातम्या

कुंडलीत चक्र आणि समुद्र योग असणारे लोक जगतात राजासारखे जीवन; तुमच्या कुंडलीत आहे?

ज्योतिषशास्त्र एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आणि वेळ यांच्या आधारे जन्मकुंडली तयार करत असते. कुंडलीतील ग्रह नक्षत्र आणि त्यांची स्थिती व्यक्तीचे भविष्य ठरवते. कुंडलीच्या माध्यमातून भविष्य सांगणारे ज्योतिषी तुम्ही पाहिले असतील.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Chakra Samudra Yoga

Chakra Samudra Yoga

ज्योतिषशास्त्र एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आणि वेळ यांच्या आधारे जन्मकुंडली तयार करत असते. कुंडलीतील ग्रह नक्षत्र आणि त्यांची स्थिती व्यक्तीचे भविष्य ठरवते. कुंडलीच्या माध्यमातून भविष्य सांगणारे ज्योतिषी तुम्ही पाहिले असतील.

ज्योतिषशास्त्रात (Astrology) अनेक योगांचे वर्णन केले आहे. ते आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी संबंधित असतात. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, कुंडलीत चक्र आणि समुद्र योग असणे शुभ असते. दोन्ही योग संपत्तीशी संबंधित आहेत. हे योग माणसाच्या जीवनात अनेक आमुलाग्र बदल घडवून आणतात.

जाणून घेऊया कुंडलीत चक्र आणि समुद्र योग धारण केल्याने कोणते फायदे होतात. अशा प्रकारे चक्र आणि समुद्र योग तयार होतात - ज्योतिषांच्या मते, जन्मकुंडलीत सर्व ग्रह विषम स्थानावर असल्‍याने चक्र योग तयार होतो. जशी कुंडलीत 1, 3, 5, 7, 9, 11 विषम स्थाने असतात. जेव्हा सर्व ग्रह या ठिकाणी असतात तेव्हा चक्र योग तयार होतो. त्याच वेळी, जर सर्व ग्रह कुंडलीत सम स्थानावर असतील तर त्यांचा समुद्र योग तयार होतो.

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत एकदाच रक्कम जमा करा आणि दरमहा मिळवा पेन्शन

कुंडलीतील सम स्थाने 2, 4, 6, 8, 10, 12 आहेत. या ठिकाणी ग्रहांच्या उपस्थितीमुळे समुद्र योग निर्माण होतो. या योगांचे फायदे - ज्योतिषांच्या मते जर एखाद्याच्या कुंडलीत चक्र आणि समुद्र योग दोन्ही तयार होत असतील तर ते खूप शुभ मानले जाते. हे योग दर्शवतात की, ती व्यक्ती खूप श्रीमंत असेल. हे योग असणारे लोक श्रीमंत घरात जन्म घेतात.

पीक विम्याबाबत कृषी विभागाकडून महत्वाचे आवाहन; शेतकऱ्यांनो लवकरात लवकर करा हे काम

तर सामान्य कुटुंबात जन्म घेतल्यानंतर ते संपत्तीने संपन्न होतात. हे चक्र योग असलेले लोक जास्त मेहनती असतात. अशा लोकांना यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात.

समुद्र योगात जन्मलेले लोक राजासारखे आयुष्य व्यतीत करतात. त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नसते. असे लोक कामात पाण्यासारखा पैसा वापरतात. अशा लोकांना प्रवास करायला आवडते.

महत्वाच्या बातम्या 
डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोलसाठी 'या' फळाचे सेवन करावे; ठरेल फायद्याचे..
पाऊस पुढचे काही दिवस विश्रांती घेणार; मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पिकांचे करा असे नियोजन
आधार शिला योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाख रुपयांचा नफा

English Summary: People Chakra Samudra Yoga horoscope kings horoscope Published on: 24 September 2022, 05:55 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters