1. कृषीपीडिया

शेतीला नाही मातीला बलवान करा!

आजचा विशेष गंभीर आहे मला शेतीच मर्म समजून सांगायचं आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतीला नाही मातीला बलवान करा!

शेतीला नाही मातीला बलवान करा!

आजचा विशेष गंभीर आहे मला शेतीच मर्म समजून सांगायचं आहे. आपल्या जमिनीत खुप जिव जिवाणू वास्तवात आहे हे काही सांगायला नवी नाही.आपन शेतीत जातो आपन कधी मातिचे निरीक्षन करतंच नाही.कारण आपल्याला मातीच लेणदेणच नाही. आपल्याला काळजी फक्त पिकांची !कोणता रोग आला काय,कोणता व्हायरस आला काय या गोष्टीची चिंता लागली असते.पण मातीची चिंता काहीच नाही.मला हेच समजत नाही आपन करतो तरी काय.वारंवार तिचं पिकं पद्धती मग बसायचं रडत शेती परवडत नाही म्हणून!मि असे शेतकरी बांधव पाहीले कि ते एकवेळ पेरले तर शेतामध्ये जाऊन पाहतच नाही ही वास्तविकता आहे.काही तर नाईलाजाने शेती क्षेत्रात काम करत आहेत मग उत्पादन होईल कसे.त्याच बरोबर मातीचे ही तसेच आहे तिला काय द्यावें तर ति सुपिक राहील या बाबतीत शेतकरी गोंधळलेला आहे. मला सांगावला लाज वाटते कि, संपूर्ण मातीपैकी ३३% माती हि नापीक झालेली आहे. 

संपूर्ण जिवसुष्टीला पोसण्यासाठी स्वतः आई समान झिजणाऱ्या या काळ्या आईच्या कुशीत आपण विष न कालवत आहे तिची सुपीकता जर‌ आबाधित ठेवायच असेल तर योग्य व्यवस्थापन पद्धतीचे अवलंबन करण्याची गरत आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर, पिकांची फेरपालट,सेंद्रिय खतांचा नियमित वापर, इत्यादींचा वापर करुन जमिनीची सुपिकता टिकवुन ठेवणं आवश्यक आहे आणि उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे.कारण माती हा मर्यादीत स्वरुपाचा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करुन भविष्यातील आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य चांगले ठेवणं गरजेचे आहे. शेती व्यवसायामध्ये सुपीक जमिनीस अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून आपणास शेतजमिनीबाबतची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. 

पीक घेण्यापूर्वी पिकास कोणत्या प्रकारची जमीन पाहिजे? जमिनीत पीक पोषकद्रव्याचा साठा कितपत आहे? जमिनीची जलधारणशक्ती आणि पोत कसा आहे? या बद्दलची शेती विषयक सखोल माहिती असणे आवश्यक आहे. यशस्वी शेती व्यवसायाचं रहस्य आहे ! मला शेतीच्या 

मुख्य जमिनीतून भरघोस पीक घेणे तसेच जमिनीची उत्पादन क्षमता कायम टिकवून ठेवणे हे आहे.जमिनीचे आरोग्य चांगल्या ठेवल्यामुळे वनस्‍पतींना आणि पिकांना आधार मिळतो.पिकांना जमिनीतून हवा, पाणी आणि सेंद्रिय पदार्थ मिळतात. जमिनीच्‍या गुणधर्मांवरच, जमिनीचे रासायनिक आणि जैविक कार्य अवलंबून असते. जमिनीचा पोत आणि संरचना हा जमिनीचा आत्‍मा आहे.

काही कांहीं गोष्टी मला माहित नव्हत्या पण मी या गोष्टी अभ्यास बारकाईने करत आहे.

मृग नक्षत्रात विजा चमकणे हे जिव जिवाणू ला सुचनेच काम करत असतं.सुप्ता अवस्थेत ऍक्टिव व्हावे यासाठी निसर्ग ही जमिनीला सुचना देण्याच काम करत असते. 

जमिनीतील जिवाणूंच्‍या कार्यामुळे त्‍यांचे विघटन होते. कारण जिवाणूंना अन्‍नाचा पुरवठा जमिनीतील सेंद्रिय पदार्थांपासून होतो.भरपूर अन्‍न मिळाले की, ह्या जिवाणूंची वाढ झपाट्याने होते जमिनीतील जिवाणूंना सेंद्रिय पदार्थांमधून अन्‍नाचा पुरवठा होतो. सेंद्रिय पदार्थ हळूहळू कुजतात. त्‍यामुळे पिकांना योग्य प्रमाणात मिळत जाते. सेंद्रिय पदार्थांमुळे वनस्‍पतींना पोषणद्रव्‍ये विद्राव्‍य स्थि‍तीत उपलब्‍ध होतात.पण महत्वाचं म्हणजे पीक उत्पादनात जमिनीचे आरोग्य चांगले ठेवणं त्याच बरोबर मातीमध्ये कुजणाऱे घटक असणे आवश्यक असून त्यातून जमिनीची सुपीकता व पीक उत्पादकता क्षमता स्पष्ट होते. यासाठी जमिनीत पीक उत्पादकता वाढविण्याची जवाबदारी आपल्या सर्वांची आहे.

 

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल..!

Save the soil all together

मिलिंद जिवनदास गोदे

9423366185

English Summary: Don't make powerful to agriculture but make powerful to soil Published on: 15 April 2022, 05:16 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters