अनेक शेतकऱ्यांच्या बागेमध्ये फळगळीचे प्रमाण वाढले आहे, त्याला कंट्रोल कसे करायचे हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.काही कृत्रिम जैवसंजीवके उदा. २, ४ -डायक्लोरोफिनॉक्सिअॅसेटिक अॅसिड (२, ४-डी), नॅफथंलीन अॅसेटीक अॅसिड (एन.ए.ए.), २, ४, ५- ट्रायक्लोरोफिनॉक्सि अंसेटिक ऑसिड (२, ४, ५-टी), जिबरेलिक ऑसिड (जी.ए.-३) वगेरे तत्सम रासायनिक संयुगे वनस्पतीतील अंतर्गत ऑक्सिजन वाढवून पेशीक्षय मंद करण्याचे कार्य करतात. अशी
कितीतरी संयुगे लिंबूवर्गीय फळगळीच्या नियंत्रणासाठी वापरली गेली आहेत.A number of compounds have been used to control citrus fruit blight.
हे ही वाचा - हस्त बहार नियोजन केल्यास मोठा फायदा होतो
लिंबूवर्गीय फळझाडांची फळधारणेनंतर होणारी फळगळ जरी नैसर्गिक व झाडाच्या सर्वसाधारण आरोग्यासाठी हितकारक असली तरी विपरित वातावरणाच्या तडाख्याने पूर्ण फळगळ होऊ नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. याकरिता अांबिया बहाराची फळधारणा झाल्यानंतर मे आणि जून महिन्यात एन.ए.ए. हे संजीवक १० पी.पी.एम. (१ ग्रॅम प्रती १oo लीटर पाणी) + १.५ टक्के युरिया (१.५ किलो
प्रती १oo लीटर पाणी) या प्रमाणात घेऊन फळे वाटाण्याएवढी असताना फवारणी करावी किंवा २, ४-डी १५ पी.पी.एम. किंवा जिबरेलिक आम्ल १५ पी.पी.एम् + बेनोमिल किंवा बाविस्टिन १000 पी.पी.एम + युरिया १ टका या मिश्रणाची प्रत्येकी एक फवारणी करावी. याच मिश्रणाच्या दोन फवारण्या पुन्हा एक महिन्याच्या अंतराने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात तोडणीपूर्वी फळगळ रोखण्यासाठी कराव्यात. त्याचप्रमाणे बुरशीजन्य रोगांमुळे होणारी गळ जास्त प्रमाणात निदर्शनास
आल्यास बेनलेट किंवा बाविस्टिन या बुरशीनाशकांच्या एक ग्रॅम एक लीटर पाण्यात मिसळून तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने तोडणीच्या साधारण दोन महिने आधीपासून कराव्यात. कीटकांमुळे होणा-या फळगळीत फुले येताना व फळधारणा होताना सिट्रस सिल्ला या किडीच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस १.२५ मि.ली. किंवा अॅसिफेट १.२५ ग्रॅम किंवा इमिडॅक्लोप्रिड 0.५ मि.ली. एक लीटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
-विनोद धोंगडे
Share your comments