1. कृषीपीडिया

असे हस्त बहार नियोजन केल्यास मोठा फायदा होतो

कागदी लिंबात विशिष्ट बहार धरणे शक्य असले तरी आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
असे हस्त बहार नियोजन केल्यास मोठा फायदा होतो

असे हस्त बहार नियोजन केल्यास मोठा फायदा होतो

कागदी लिंबात विशिष्ट बहार धरणे शक्य असले तरी आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही. कारण, एखाद्या विशिष्ट बहारासाठी ताण दिला तर त्या वेळी अगोदरच्या बहाराची फळे अपक्व स्थितीतच गळून पडतात. उदा. मृग बहर घेतल्यास झाडावर आंबे बहाराची फळे २ ते २.५ महिन्यांची असतात. आंबे बहार घेतल्यास झाडावर हस्त बहाराची फळे वाटाण्याएवढी असतात.तीन ते चार महिने वयाच्या जुन्या पक्व फांद्यावरच फुले येतात. म्हणून आपणास हव्या असणाऱ्या बहराचे उत्पादन मिळण्यासाठी अशा फांद्या तीन ते

चार महिने वयाच्या जुन्या व पक्व असणे आवश्यक आहे.Must be four months old and mature.हस्त बहराच्या व्यवस्थापनात खत व्यवस्थापन, कार्बोहायड्रेटस आणि नत्र यांचे प्रमाण, संजीवकांचा वापर, कीड व रोगांचे योग्यवेळी नियंत्रण महत्त्वाचे असते.

हे ही वाचा - असे करा फळगळीचे नियंत्रण

क्लरमेक्वाट क्लोराइड, जिबरेलीक ॲसिड, एनएए,पोटॅशियम नायट्रेट इत्यादींचा वापर फायदेशीर आढळून आलेला आहे.क्लोरमेक्वाट क्लोराइडसारख्या वाढ नियंत्रकामुळे शेंडावाढ मंदावते. रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.हस्त बहर धरण्यासाठी कागदी लिंबू झाडांना

आॅगस्ट- सप्टेंबरमध्ये पाण्याचा ताण द्यावा लागतो; परंतु या वेळी जर पाऊस असेल, तर बागेला ताण बसत नसल्यामुळे तसेच हवामान प्रतिकूल असल्यास फुलोऱ्याचे प्रमाण कमी मिळते. सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये फुलोऱ्याचे प्रमाण फक्त १० ते १५ टक्के असते. हस्त बहरातील फुलोऱ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी आॅगस्ट - सप्टेंबर महिन्यामध्ये क्लोरमेक्वाट क्लोराइड २ मि.लि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दोन फवारण्या एक महिन्याच्या अंतराने द्याव्यात. 

शिफारसी - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि अखिल भारतीय समन्वित लिंबूवर्गीय फळे संशोधन प्रकल्प, तिरुपती या ठिकाणी कागदी लिंबू हस्त बहार उत्पादनवाढीसाठी घेण्यात आलेल्या प्रयोगानुसार वाढ विरोधक व संजीवकांच्या फवारणीची शिफारस करण्यात आलेली आहे.सप्टेंबरमध्ये क्लोरमेक्वाट क्लोराइड ( २ मिलि/लिटर) फवारणी करावी.आॅक्टोबर महिन्यात १ टक्का पोटॅशियम नायट्रेटची (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी.

या फवारणीमुळे फुलोऱ्याचे प्रमाण वाढून हस्त बहाराच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.सध्या ज्या शेतकऱ्यांची जूनमधील जिबरेलीक ॲसिडची फवारणी चुकली असल्यास त्यांनी क्लोरमेक्वाट क्लोराइड २ मि.लि प्रतिलिटर पाण्यात मिसळून दोन फवारण्या आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात केल्यास फाजील शेंडावाढ मंदावते, रोग प्रतिकारक शक्ती सुधारते.आॅक्टोबरमध्ये फळगळ कमी करण्यासाठी एनएए हे संजीवक १० मिलि ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

English Summary: Such hands-on planning is of great benefit Published on: 23 September 2022, 09:33 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters