1. कृषीपीडिया

तुरी मधील मर रोग नियंञण उपाय

मर रोग हा रोग Fusarium udum या बुरशीमुळे होतो.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
तुरी मधील मर रोग नियंञण उपाय

तुरी मधील मर रोग नियंञण उपाय

मर रोग हा रोग Fusarium udum या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव पीक रोपावस्थेत असल्यापासून ते झाडांना फुले व शेंगा येईपर्यंत दिसून येतो. त्यामुळे या कालावधीत या रोगमुळे तूर पिकाचे नुकसान होत असते. या रोगाची सुरुवात जमिनीत होऊन त्याचे कावकतंतू मुळावाटे झाडात शिरून अन्ननलिकेत वाढत जातात. त्यामुळे अन्ननलिकेतून पाणी आणि अन्नद्रव्याचा पुरवठा बंद होतो. रोगग्रस्त झाडांची पाने पिवळी पडून ती जमिनीकडे झुकतात. सुरवातीस काही फांद्या आणि नंतर संपूर्ण झाडच वाळून जाते.खोडाचा व मुळाचा आतील भाग काळा पडतो

आणि मर झालेल्या खोडावर तांबूस रंगाचे पट्टे दिसतात.जास्त पाऊस व अद्रता असल्यास मुळास बुरशीचा थर येते मर सुरू होते...नियंत्रण :- रोगग्रस्त झाडे उपटून टाकावीत तसेच उन्हाळ्यामध्ये शेताची खोल नांगरट करावी.तुरीमध्ये ज्वारी, बाजरी, मका यासारखी अंतर पीके घ्यावीत.विपुला, बी.एस.एम.आर. – ८५३, बी.एस.एम.आर.-७३६, सी-११, आशा रोगप्रतिकारक्षम वाणांची पेरणी करावी.पेरणी पूर्वी ट्रायकोडर्मा ६ ग्राम/कि. किंवा कार्बेनन्डॅझीम २ ग्रॅम/कि. बियाण्यास चोळावे...तुरपिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून याच्या नियंत्रणासाठी आपण कॉपर ऑक्सि क्लोराईड घटक असलेले ५०० ग्रॅम आणि कासूगामायसिन

घटक असलेले कासू बी २५० मिली प्रती एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिक्स करून दयावे. तसेच मेटालॅक्सिल+ मॅंकोझेब घटक असणारे मॅटको ,सिसकाॅन.. 2.5 ग्रॅम/लिटर फवारणीद्वारे द्यावे... रोको, एलिएट ,ञिनाश, या पैकी एकाची फवारणी किंवा ड्रेंचीग करावी...तसेच जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ची 2किलो.शेण खतात मिसळू ते तुरीच्या दोन्ही बाजूस टाकावे जेव्हा पेरणी झाली तेव्हा बेड वर अथवा सरी वर करावी लागते किंवा पिक लहान असताना बोथ मारून पिकाला पाटी मारून घ्यावीच 

अति पावसामुळे ,व या वातावरणात तूर पिकाला खूप मोठ्या प्रमाणात मर(मूळ कुज) लागत ,त्या मध्ये तुरीची वाढ थांबत असून मूळ सडायला लागत,परिणामी झाडाची संख्या कमी होत,व उत्पादन घटत, ते रोखण्यासाठी शक्य झाल्यास खालील उपाय योजना करावी एकरी :-1)हुमिक 98% 1 ली2)ट्रायकोडर्मा-2 कि3) 19-19-19 -2कीपंपाच्या साहयाने प्रत्येक झाडाला आवळणी (ड्रिंचिंग) करा -1) Humic 98% 1 L2) Trichoderma-2 K3) 19-19-19 -2 Drinching each plant with the help of a keep pumpकिंवा चांगला परिणाम पाहण्यासाठी आठ दिवसांनी रायझोमिका +)ट्रायकोडर्मा- बायोसंजिवणी यांची आवळणी करून घ्यावी फार लवकर पिक सुधारेल.

English Summary: Death control measures in Turi Published on: 21 July 2022, 03:30 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters