1. कृषीपीडिया

करा 'या' औषधी वनस्पतीची लागवड; आणि कमवा महिन्याला लाखो रुपये

शतवारी वनस्पती शेतकऱ्यांसाठी वरदानच आहे. या वनस्पतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात झपाट्याने वाढ होते. शतवारी या वनस्पतीला वेगवगेळ्या नावांनी ओळखले जाते. एकदा शतावरीची लागवड झाली की त्यातून अनेक वर्ष उत्पादन मिळू शकते.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
शतवारी वनस्पती

शतवारी वनस्पती

आपल्या दैनंदिन जीवनात औषधी वनस्पतींचे महत्व तर सगळ्यांनाच माहित आहे. औषधी वनस्पती जितकी आरोग्याला फायदेशीर आहे तेवढीच त्यांची लागवड शेतकऱ्यांना चांगला फायदा देणारी आहे. शेतकरी बंधू उत्पादनात भरघोस वाढ होण्यासाठी आणि दर्जावान पीक येण्यासाठी पीक पध्दतीमध्ये बदल करतात. तसेच कमी वेळात अधिकाधिक उत्पादन या गोष्टीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सध्या औषधी वनस्पतीचीही लागवड वाढत आहे.

उत्पादन मिळवण्यासाठी शेती पिकांचीच लागवड केली पाहिजे हा समज बाजूला ठेऊन औषधी वनस्पतीमधूनही हा उद्देश साधता येत आहे. तसेच याची लागवड कमी खर्चात, कमी वेळात अधिक नफा होत असल्याने औषधी वनस्पतीच्या लागवडीत वाढ होत आहे. औषधी वनस्पतींचे अनेक प्रकार आहेत त्यातीलच शतवारी. शतवारी वनस्पती शेतकऱ्यांसाठी वरदानच आहे. या वनस्पतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात झपाट्याने वाढ होते. शतवारी या वनस्पतीला वेगवगेळ्या नावांनी ओळखले जाते. एकदा शतावरीची लागवड झाली की त्यातून अनेक वर्ष उत्पादन मिळू शकते.

मात्र त्यासाठी त्याला आवश्यक असणारे घटक, वातावरण मिळणे गरजेचं आहे. तसेच त्याचे योग्य संगोपण होणे देखील महत्वाचे आहे. योग्य काळजी घेतल्यास या वनस्पतीमधून शेतकरी एकरी 4 लाख रुपये उत्पादन मिळवू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शतावरी हा एक उत्तम पर्याय आहे.
भारतात ही वनस्पती हिमालयीन प्रदेशांत आढळते. तसेच शतावरीची फुले पांढरी असतात. आणि फळ गुच्छांमध्ये असते. याचा कंद क्लस्टर्समध्ये असतो, त्यामुळे याचा वापर औषधांमध्ये केला जातो. शतावरीची लागवड केल्यापासून अवघ्या 3 वर्षात ही वनस्पती पूर्णपणे विकसित होण्यास आणि कंद वापरण्या योग्य होते.

पिकांच्या लागवडीसाठी माती कोणत्या प्रकारची आहे हे पाहणे महत्वाचे असते. शतावरी या औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी बलुई चिंब माती सर्वात योग्य मानली जाते. या वनस्पतींना जास्त पाण्याची आवश्यकता नसते. सुरुवातीला आठवड्यातून एकदा व महिन्यातून एकदा रोपांची वाढ झाल्यावर थोडे पाणी द्यावे लागणार आहे.शतावरी वनस्पतीच्या मुळांच्यावर पातळ साल असते. साल काढल्यावर पांढरे दुधाचे मूळ मिळते, ते सुकल्यावर त्याची पावडर होते.
आणि त्यासाठी उष्णता, दमट व 10.5 अंश सेल्सिअस तापमान असलेले व वार्षिक 250 सेंमी चे पर्जन्यमान असलेले हवामान शतावरी लागवडीसाठी सुयोग्य मानले जाते. शतावरी वनस्पतीच्या लागवडीसाठी एकरी 5 किलो बियाणे लागते.

बियांपासून शतावरीची रोपे तयार केली जातात. रोप लावल्यानंतर जेव्हा वनस्पतीची वाढ होण्यास सुरुवात होते, तेव्हा त्याच्या मुळांचे उत्खनन करावे. त्यानंतर ते स्वतंत्रपणे ते वाळवले जातात. शेतकऱ्यांना एकरी 350 क्विंटल 'गिलियड मुळे' मिळतात, जी सुकल्यानंतर 35 क्विंटलपर्यंत शिल्लक राहतात.शतावरीच्या लागवडीत एकरी 80 हजार ते 1 लाख रुपये इतका खर्च येतो. आणि एकरी चार लाख रुपये इतका नफा मिळतो. सध्या अनेक कंपन्या शेतकऱ्यांशी करार करून शतावरीची शेती करत आहेत. आणि याचा फायदा शेतकऱ्यांना उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठेचा शोध घ्यावा लागत नाही.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांच्या प्रतिक्षेचा अंत; 'या' योजनेपासून शेतकरी वंचित
गहू पिकाचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची सरकारकडे बोनसची मागणी
ड्रोन खरेदी आता होणार सोपी; सरकारकडून मिळणार भरघोस अनुदान

English Summary: Cultivate this herb; And earn millions of rupees a month Published on: 04 May 2022, 06:09 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters