1. कृषीपीडिया

पिकावरील काळी माशी व तिचे व्यवस्थापन

संत्रा पिकावरील काळी माशी ही महत्त्वाची कीड असून या किडीचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर फार मोठ्या प्रमाणात होतो.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पिकावरील काळी माशी व तिचे व्यवस्थापन

पिकावरील काळी माशी व तिचे व्यवस्थापन

संत्रा पिकावरील काळी माशी ही महत्त्वाची कीड असून या किडीचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर फार मोठ्या प्रमाणात होतो. सर्वप्रथम या किडीची किडीची ओळख करून घेऊ.

 (A)संत्रावरील काळी माशी व तिची ओळख : संत्रा पिकावरील काळी माशी आकाराने लहान साधारणत एक ते दीड मिलिमीटर लांब असून पंख काळसर व पोटाचा भाग लाल असतो. विदर्भातल्या हवामानात या किडीच्या तीन पिढ्या पूर्ण होतात होतात. या कीडीच्या माशा नवतीच्या कोवळ्या पानावर खालच्या बाजूने अंडी घालतात. कोवळ्या पानावर पानावर घातलेली अंडी सूक्ष्म असून सुरुवातीस पिवळसर रंगाची असतात. चार ते पाच दिवसानंतर या अंड्यांचा रंग करडा होतो. उन्हाळ्यात पंधरा ते वीस दिवसात तर हिवाळ्यात पंचवीस ते तीस दिवसात अंड्यातून माशीची पिले बाहेर पडतात. 

अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले सूक्ष्म आकाराची चापट व फिकट पिवळसर रंगाची असतात त्यामुळे ती लक्षात येत नाहीत. ही पिल्ले पानावर फिरून फिरून योग्य जागेचा शोध घेतात व नंतर एकाच ठिकाणी राहून पानातील रस शोषण करतात अन्न रस शोषण करतात. काही दिवसानंतर ही पिल्ले काळी पडतात तेव्हा प्रादुर्भाव लक्षात येतो . पिल्लाच्या तीन अवस्था पूर्ण होण्यास किमान चार ते सहा आठवडे लागतात पिल्ले नंतर कोषावस्थेत जातात. कोश पूर्ण काळे व टणक असतात. कोषावस्था सहा ते दहा आठवड्याची असते. किडीच्या अंगातून साखरेच्या पाका सारखा चिकट द्रव बाहेर पडतो. या चिकट स्त्रावावर उष्ण व दमट हवामानात काळी बुरशी वाढू लागते. या काळसर बुरशीला कोळशी म्हणून संबोधण्यात येते .संत्र्याच्या झाडाला वर्षातून तीन वेळा नवती येते. 

म्हणजे मृग बहारा करिता जून-जुलै या महिन्यात तर हस्त बहारा करिता ऑक्टोबर नोव्हेंबर आणि आंबिया बहारा करिता जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात संत्र्याला नवती येते. याच दरम्यान प्रौढ माशा कोषातून बाहेर पडतात व नवतीच्या कोवळ्या पानाच्या मागील बाजूवर अंडी घालतात. प्रौढ माशा 2 ते 10 दिवस जगतात. अंड्यातून निघालेली पिल्ले अत्यंत नाजूक असल्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी हीच प्रथम पिल्ल अवस्था सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून या किडीच्या व्यवस्थापनासाठी खालील शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी खालील निर्देशित वेळी करणे गरजेचे आहे

 ( B) संत्र्यावरील काळी माशी करिता व्यवस्थापन योजना : (१)मृग बहरासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात तर हस्ता बहारासाठी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात व पुन्हा पंधरा दिवसानंतर व आंबिया बहारासाठी मार्चच्या शेवटचा आठवडा व पुन्हा पंधरा दिवसानंतर

निंबोळी तेल 100 ते 125 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. निंबोळी तेल पाण्यात मिश्रन करण्यासाठी शंभर मिली निंबोळी तेलात दहा ग्रॅम डिटर्जंट किंवा दहा मिली टिपोल या प्रमाणात मिसळावे. मृग बहारा वरील फवारणीत कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 30 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन पाण्यात मिसळूनफवारणी करावी (२) संत्रा पिकावर वेळोवेळी विशेषता नवती च्या कालावधीत पाच टक्के निंबोळी अर्काच्या अर्काच्या 15 दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात. (३) वर निर्देशित काळा माशीचे जीवनचक्र लक्षात घेऊन प्रौढ काळी माशीच्या माशा कोषातून बाहेर निघण्याच्या अवस्थेत संत्रा बगीच्यात अधून मधून पिवळ्या रंगाचे पत्र्याचे पृष्ठभागावर एरंडीचे तेल अथवा ग्रीस लावलेले पिवळे चिकट सापळे बगीच्यात उभारावे. 

 

 राजेश डवरे तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड (करडा) तथा कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम

English Summary: Crops black fly and their managemet Published on: 01 March 2022, 11:20 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters