1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांनी एकत्र च यावे कारण

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा कलंक मिटविण्यासाठी, गेली कित्येक वर्षापासून शेतकरी चळवळ ही सातत्याने चालू आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतकऱ्यांनी एकत्र च  यावे कारण

शेतकऱ्यांनी एकत्र च यावे कारण

रस्त्यावर येणे मोर्चे काढणे, अश्रूधूरांच्या नळकांड्या सहन करणे.शासनास निवेदने देणे.ही सर्व कामे करीत असताना मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न मीटले नाही. "राजकारणात नेते मात्र मोठे व गब्बर झाले.शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न मात्र अतिशय लहान झाले."        ही परिस्थिती आता बदलण्याची गरज आहे.आपण सर्वच राजकीय पक्षांना मतदान करून पाहिले, आमच्या बापाचे वाळवंट झाल्यावर आता पुढे मुलाबाळांचे वाळवंट होऊन, त्यांच्यावर आत्महत्या करायची वेळ येऊ नये हे जर वाटत असेल तर फक्त शेतकरी संघटनेला आता मतदान करावे लागेल. कारण त्यासाठी शेतकरी हिताचे कायदे राज्य शासनापासून तर केंद्र शासनापर्यंत बदलविण्याची गरज आहे. आणि हे शेतकरी, शेतमजुरांच्या हिताचे कायदे करण्यासाठी आतापर्यंत आपण निवडून पाठवलेले पक्षप्रतिनिधी बदल करू शकले नाही. हा आता तर राजकीय व सामाजिक दृष्टिकोनातून बदल करणे काळाची गरज आहे. 

तुम्ही कष्टाने जमा केलेल्या तिजोऱ्यामध्ये राजकीय पक्ष निधी अति भरमसाठ जमा झाला आहे, आणि त्यांच्या जोरावरच ते मतदारांना नाचवणार आहे. पक्षाने निवडलेले प्रतिनिधी हे बाहुली, व खेळणी आहे या निवडणुकीत जर तुम्ही बदल केला नाही तर पुढ तुम्हाला तुमचे मुलं-बाळा साठी विहिरीची वाट धरल्याशिवाय काही इलाज नाही. कोणताही राजकीय पक्ष शेतकरी शेतमजुरांच्या हिताचे कायदे करण्यास तयार नाही.तेव्हा आपणास आता विचारपूर्वक मतदान करावे लागेल. आता मते मागणे साठी आल्यास फक्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना झोडपे देणे एवढेच बाकीचे शिल्लक राहिले महानगरपालिका,जिल्हा परिषद चे सदस्य निवडून आल्याशिवाय आमदार, खासदारकिची वाटचाल मोकळी होऊ शकणार नाही. तेव्हा खंबीरते ने कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी न पडता मतदान करणे हेच सार्थकी हिताचे ठरेल. त्यासाठी आता आंदोलनाची वेळ संपल्यामुळे व राजकीय हिताचे कायदे तयार करण्यासाठी शेतकरी संघटना जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपली ताकद अजमावणार आहे ती, सुद्धा तुमच्या

लोककल्याणासाठी लढेल . आणि ती ताकद आता तुमच्या जनशक्तीच्याच भरोशावर आहे. अपप्रचाराला बळी पडल्यास त्याचे परिणाम म्हणजेच शेतकरी आत्महत्या पुन्हा वाढल्या शिवाय राहणार नाही. आता पोस्टरबाजी चा प्रचंड महापूर व शहरात फक्त पैशाचा पूर दिशेल. आणि या बेबंदशाहीत तुम्ही सर्व विसरून जाऊन, आतापर्यंतचुकीच्या पद्धतीने झालेले मतदान टाळावे त्यासाठी शेतकरी संघटना या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांन सोबत युती करून निवडणूक लढवीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा गांधीचे, व शेतकऱ्यांचे दुःखाचे यांनी फक्त नाव घेतले मात्र त्यांचे विचार मातीत घातले. शहरी विकासाच्या कामात शेतकरी संघटना महानगरपालिकेतील उमेदवारांना मदत करण्यास तयार आहे. कारण शहरात येणारी मंडळी ही ग्रामीण भागातूनच आलेली आहे. आणि शहरी लोकांचे जीवन हे सर्व शेतकरी, शेतमजूर च्या भरोशावरच ते जगत आहे. अन्नावाचून कोणताही शहरी प्राणी जगत नाही. म्हणून ग्रामीण भागातील लहान भावाला मदत करून जगवणे हे शहरी लोकांचे कर्तव्य आहे.काँग्रेस ,बीजेपी, शिवसेना, व राष्ट्रवादी या राजकीय पक्षांसोबत सध्याच्या व्यवस्थेत तरी शेतकरी संघटनेची युती होणार नाही. कारण शेतकरी हिताचे कायदे तयार करणे व शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे, या विषयावर ते शेतकरी संघटना सोबत एकत्र येऊ शकत नाही.

निवडणुकीत आपल्याला स्वतःच्या बळावर राजकीय पक्ष विरहित निवडणूक लढावी लागणार आहे. त्यासाठीच शेतकर्‍यांनी आता आपली कंबर कसावी.पुढील निवडणुका ह्या शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली स्वतंत्र पणे लढण्यात येतील.हिंदू खत्रे मे है, ना मुस्लिम खतरेमे है l सच्चाई तो यह है की, इस देश का किसान खतरे मे है l री सर्व मतदार बंधूंना शेतकरी चळवळींना सहकार्य करून आपल्या जीवनाची लक्तरे बदलावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व गट, संभाजी ब्रिगेड , तसेच शेतकऱ्यांच्या नाव घेऊन लढणाऱ्या सर्व लहान संघटना व तसेच अन्य लोक चळवळीतील सर्व लहान गटांनी ही निवडणूक शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन लढवावी . तरच शेतकऱ्यांना व मजुरांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल.या देशात भ्रष्टाचाराचे , फक्त राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करतात मात्र आता सर्वांना ईडी लावण्याची वेळ आली आहे. सर्वच आमदार-खासदारांचे हिशोब तपासणे आता गरजेचे आहे. फक्त या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या घामाच्या जमा झालेल्या शासन तिजोरीत फक्त चोऱ्या केल्या आहे. भारत देशाला लागलेला आत्महत्येचा कलंक जर आपण मतदारांनी आता मिटला नाही तर तो पुढेही मिटणार नाही. अभी नही तो, कभी नही. तरी स्वहितासाठी व सुराज्यासाठी तयार रहा.

 

  - धनंजय पाटील काकडे.

English Summary: Because farmers should come together Published on: 03 June 2022, 01:31 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters