1. कृषीपीडिया

माती आणि शेती यांचा वैज्ञानिक परिपेक्ष मांडणारा लेख

माती जिवंत ठेवा माती धूळ नव्हे, जिवंत परिसंस्था आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
माती आणि शेती यांचा वैज्ञानिक परिपेक्ष मांडणारा लेख

माती आणि शेती यांचा वैज्ञानिक परिपेक्ष मांडणारा लेख

माती जिवंत ठेवा माती धूळ नव्हे, जिवंत परिसंस्था आहे.माणसाला शेतीचा शोध लागला म्हणजे, त्याने मारुण खाण्याऐवजी पेरुण खायला सुरुवात केली. आणि एका नवीन संस्कृतीचं बिज रोवल्या गेल्.एका दाण्यात हजार दाणे निर्माण करण्याची उद्भुत क्षमता हे ह्या मातीचे सर्वात मोठे वैशिष्ट आहे. हि क्षमता निर्माण करणारा घटक म्हणजे माती. या सुपिक मातीवरच आपल्या शेतीचा आणि अवघ्या जिवसृष्टीचा डोलारा उभा आहे.जिचा आपण काळी आई म्हणुन गौरव करतो तीच आज मरणासुन्न अवस्थेत पडलीय. थोडक्यात आपल्या जमिनीला ग्रहण लागलय.जमिनीचे आरोग्य बिघडल्याने जमिन झपाटयाने नापिक होतेय.

आपण वेळीच जागे झालो नाही तर, शेती , पर्यावरण आणि समाज यांच्यावर होणाऱ्या दुष्परिणामांनं आपल्याला सामोर जावे लागेल. शास्त्रज्ञ म्हणताय ,भविष्यात मुलांना नुसता सातबारा उतारा नका देवू, त्यासोबत उत्कृष्ट पध्दतीची जमिनपण दया...योग्य दिशेने प्रयत्न केले तर आपण आपली जमिन वाचवू शकतो..योग्य खत व्यवस्थापन आणि फायदेशीर शेती उत्पादन यासाठी मातीपरिक्षण हे एक शेतीच अवश्य अंग आहे .माती परिक्षणामुळे आपल्या जमिनीचा सामु किती आहे, त्यात कुठले अन्नघटक किती प्रमाणात कमी जास्त आहेत हि माहिती मिळते. ह्यामुळे शेतकरी बांधवांच्या खर्चात बचत होवून. संतुलीत खतांचा वापरून भरघोस उत्पादन काढता येते.. माती परिक्षणाचे अमुल्य फायदे शेतकरी बांधवांना कळत आहेत.

आपले आजोबा वडील हे पारंपरिक पद्धतीने शेती करत आलेत. तेही रासायनिक खतांचा वापर करतच होते. परंतु त्या वेळच्या जमिनी ह्या सुपीक जमिनी होत्या शेणखताचा योग्य वापर व्हायचा व त्याचबरोबर जमिनीची पोत टिकवून होती. आताचा विचार केला तर परिस्थितीत बदल झालेला आहे.कारण आपली जमीन नापीक होऊ लागले शेतकरी बांधवांनी वेळीच लक्ष दिलं तर त्याचा भला मोठा फायदा होऊ शकतो आज माती परीक्षणाचे अमूल्य फायदे शेतकऱ्यांना लक्षात येत आहेत ते आपल्या शेतीचे माती परीक्षण करुन घेत आहेत.मी पंकज घटे शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की, मी कुठला शास्त्रज्ञ नसून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील बीएससी ऍग्री झालेला व्यक्ती आहे. माझ्या परीने असलेल्या अनुभवातून मी आपल्यापर्यंत माती परीक्षणाचा संदेश पोचवीत आहे.

हे आहेत माती परीक्षणाचे फायदे 1) माती परीक्षणामुळे जमिनीत असलेल्या अन्नद्रव्यांचेप्रमाण समजते2) जमीन आम्लधर्मी आहे की विम्लधर्मीय आहे त्यानुसार पिकांचे नियोजन करता येते.3) संतुलित खतांचा वापर करता येतो पीक उत्पादन वाढीबरोबर खतांची बचत होते पिकांच्या वाढीस आवश्यक असणारे अन्नद्रव्यांचा समतोल कायम समतोल राखता येतो.4) माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन वाढविण्यास मदत होते.5) शास्त्रशुद्ध पद्धतीने मृदा नमुने काढण्यावर माती परीक्षण प्रयोगशाळेची गुणवत्ता व खतांची शिफारस मात्रा अवलंबून असते त्याकरिता योग्य माती नमुने प्रयोगशाळेत जमा करावेत.

 

श्री. पंकज घटे

(लेखक कृषीशास्त्र विषयांत पदवीधर असून कृषी तंत्र विद्यालय मुक्ताईनगर येथे प्राचार्य आहेत)

English Summary: An article presenting a scientific perspective on soil and agriculture Published on: 19 June 2022, 05:35 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters