आज आपन अन्नधान्य, फळे, भाजीपाला आणि दूध उत्पादनात जगातील पहिल्या तीन देशांमध्ये आहे, तरीही हा अन्नदाता अडचणीत का आहे? शेवटी काय कारण काय आहे? आपल्या इथल्या शेतीची अवस्था दरवर्षी ढासळत चालली आहे.वास्तविक,आज शेती आणि शेतकरी यांच्यावर जे संकट आले आहे, त्याची दोन प्रमुख कारणे आहेत.आपल्या शेतमालाला खर्चानुसार भाव मिळत नाही.
त्याच बरोबर आपल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आज आहे.अखेर तोट्याची शेती हे किती दिवस चालणार?
आपल्या शेतकर्यांनी कमी उत्पादन घेतले तरी त्रास आणि जास्त उत्पादन घेतल्यास जास्त त्रास होतो. दुसरे संकट म्हणजे वर्षानुवर्षे शेतीमालाचे उत्पादन कमी होणे. आज ७० टक्क्यांहून अधिक शेती एक हेक्टरपेक्षा कमी आहे.आपल्या शेतीचे भविष्य तसेच वर्तमान या स्थितीत आहे. परंतु लोकसंख्येच्या वाढीसह काही क्षेत्र अकृषक होत आहे.हे कारण आहे कृषी क्षेत्र लहान होण्याच आणि त्याच बरोबर उत्पादक कमी होत आहे आणि लहान शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर मोठ्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.ग्रामीण भागातील मोठ्या युवा वर्ग
शेती करण्याऐवजी शहरात जाऊन रोजगार हा आता सर्वात प्रतिष्ठिचा व्यवसाय बनवीला आहे.आपण कसत असलेल्या शेतीची प्रतिष्ठा आणि दर्जा सातत्याने घसरत आहे.जणू गावातून शहराकडे जाण्याची स्पर्धा लागली कि काय असे वाटत आहे. तरुण वर्ग हा शेतीपासून भ्रमनिरास होत आहे.सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सुशिक्षित ग्रामीण तरुण, शेतीपासून जवळजवळ पूर्णपणे दुरावलाआहे.आपल्या येणार्या पुढच्या पिढीने आपला पारंपारिक व्यवसाय म्हणजे शेती हा स्वीकारावा असे बहुतेक शेतकऱ्यांनाही वाटतच नाही.
आज सुमारे ७० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात.त्या लोकांची उपजीविका शेती वर अवलंबून आहे परंतु त्या शेतकर्यांना उपजीविकेचे इतर चांगले साधन सापडल्यास त्यांना शेती सोडायला सुद्धा तयार आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतीचु होणारी नामुष्की हा चिंतेचा विषय आहे.शेती हे पीक उत्पन्नाचे प्रमुख साधन यासाठी शेती या क्षेत्रात भरपूर काही शिकण्यासारखे आहे आपल्या मनात शेती विषय जिद्द असणे आवश्यक आहे त्याच बरोबर आपन शकतो पाण्याचा कमी वापर म्हणजे ठिबक सिंचन व तुषार सिंचन व शेतीतील नवं नवीन पिकपद्धती आणि कृषी आणि कृषी-तंत्रज्ञान यांच्यात समन्वय साधता आला तर ओसाड वाळवंट ही हिरवेगार करता येतात.
Save the soil all together
मिलिंद जि गोदे
9423361185
milindgode111@gmail.com
Mission agriculture soil information
Share your comments