1. कृषीपीडिया

शेती तंञ: एक दृष्टीक्षेप

शेती व्यवसाय हा आज तरी सर्वात अवघड असा व्यवसाय झाला आहे!

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेती तंञ: एक दृष्टीक्षेप

शेती तंञ: एक दृष्टीक्षेप

शेती व्यवसाय हा आज तरी सर्वात अवघड असा व्यवसाय झाला आहे! या व्यवसायात अनंत अशा अडचणी नक्कीच आहेत. त्यातील कित्येक अडचणी या आपल्या आवाक्या बाहेरील असतात! शिवाय चांगली नगदी व्यापारी पिके घ्यायची असतील तर त्यासाठी शेतीत चांगले भांडवल सुध्दा ओतावेच लागते! अनेक गोष्टींची जुळवणी करावी लागते. कौशल्यपुर्ण व्यवस्थापन करावे लागते. राञं-दिवस काम करावे लागते. ऊन, वारा, थंडी, पाऊस, श्वापदे... कशाची तमा न बाळगता कष्टाची तयारी ठेवावी लागते! 

यातील जमिन हा मुद्दा सोडला तरी पाणी, मजुर Apart from the issue of land, water, labour आणि निविष्ठा या ठळक पण फार महत्वपुर्ण अशा बाबींचे व्यवस्थापन करणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नक्कीच नसते!

मायक्रो एक्सलन्स-ESM युरोपीयन तंत्रज्ञानावर आधारीत मायक्रो ग्रॅन्युलर उत्पादन.

अस्मानी-सुलतानी: शिवाय 'अस्मानी-सुलतानी ' म्हणून संबोधले जाणारे शेतकऱ्याची नित्यनेमाने कसोटी पहाणारे फार मोठे कायमस्वरुपी असे. शेतकऱ्याचे ज्यावर कोणतेही नियंञण नसणारे हे दोन बलदंड शञू आहेत!अस्मानी संकटांमध्ये बरेचदा दुष्काळ अर्थातच 'अवर्षण' हा तर शेतकऱ्याच्या कायमच पाचवीला पुजलेला असतो.

शेती:एक आव्हान - होतकरु तरुणांसाठी शेती क्षेञात नक्कीच आव्हान आहे! येथे अस्मानी-सुलतानीची कितीही संकटे असली तरी करणाऱ्याला येथे वाव सुध्दा तेवढाच मोठा आहे! शिवाय या व्यवसायात यशस्वी झालात तर... यात सृजनाचा, नवनिर्मितीचा आनंदही तेवढाच मोठा आहे! किंबहुना ती तर फार अमुल्य अशी निसर्गाची मोठी देण आहे! खूप गोड असा आरोग्यवर्धक मेवा आहे! मनाच्या आणि तनाच्या आरोग्यासाठी आनंदाचा परमोच्च असा ठेवा आहे!

वडीलोपार्जित शेती नसतांनाही काही तरुण आज भाडेतत्वावर शेती घेऊन सुध्दा ती यशस्वीपणे करीत आहेत! त्यासाठी खूप मोठ्या क्षेञाचीही गरज नाही. पॉलीहाऊस, शेडनेट हाऊस, मल्टीलेअर शेती या सारखे अद्ययावत व नियंञित शेतीतंञ वापरुन फायद्याची शेती नक्कीच करता येऊ शकते, यात तिळमाञ शंका नाही!विषमुक्त शेती काळाची गरज: माञ रासायनिक विषारी शेती पध्दतीला फाटा देऊन विषमुक्त सेंद्रिय शेती ही आज काळाची गरज झाली आहे! आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या

देशासाठी आणि एकूणच समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी!! त्यामुळे आपल्या सर्वांचे आरोग्य तर सांभाळले जाईलच; पण शिवाय शेती-माती आणि पाण्याचेही प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे.रासायनिक शेतीने शेती, माती आणि सर्वांचेच आरोग्य आता धोक्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वांनीच वेळीच जागृत होण्याची नितांत गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन व प्रशिक्षणाची नितांत गरज आहे.शेती विकासाच्या संधी: ईतर कोणत्याही

व्यवसायाप्रमाणेच शेतीला सुध्दा निष्णात मनुष्यबळाची गरज आहे. " दुसरे काहीच जमत नाही म्हणून शेती तरी करा " अशा प्रकारचे लोक शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणात असल्याने बरेचदा शेती तोट्यात जाते ..हे सत्य सुध्दा नाकारुन चालणार नाही!तेव्हा चांगल्या शिकलेल्या बुध्दिवान होतकरु तरुणांनी शेतीत उतरले तर या शेतीक्षेञाला नवीन संजीवनी मिळून " शेतीला भविष्यात सोन्याचे दिवस येतील " अशी आशा करायला काहीच हरकत नाही!शेवटी सारे भविष्य तरुणांच्याच हा!

 

तु.सी.ढिकले

7588828834

English Summary: Agricultural Technology: An Overview Published on: 08 October 2022, 09:10 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters