सध्या केंद्र सरकारने २५ हजार मेगावॉट सौरऊर्जा (Solar Farming) तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसाह्य देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा आणि सहभाग असणार आहे.
आज ज्या शेतकऱ्यांकडे विजेवर चालणाऱ्या मोटारी नाहीत त्यांना इंजिनद्वारे सिंचन करावे लागते, ते सौरऊर्जेवर चालणारी मोटर बसवून सिंचनाची सोय करू शकतात. ज्या शेतकऱ्यांकडे विजेवर चालणारी मोटर आहे तेथे सोलरचा वापर करून मोटर चालवू शकतात.
तसेच जास्त झालेली वीज कंपनीला विकू शकतात. यातून शेतकरी विजेच्या दृष्टीने स्वावलंबी होतील. परंतु ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामधून वीजनिर्मिती करायची आहे त्यांना तिसरा पर्याय म्हणजे पूर्ण सोलर पॅनेल बसवून वीज तयार करून ती वीज कंपनीला विकणे, असा आहे.
आता शेती विकत घेण्यासाठी सरकारकडून मिळते अनुदान, जाणून घ्या काय आहे योजना..
शेतकऱ्याला त्याच्या शेतातून वीज विकून आर्थिक फायदा होतो. एकदाच गुंतवणूक केली, तर २५ वर्षे उत्पादन मिळण्याची हमी मिळते. याला जास्त खर्च नाही. वीज ठरवून दिलेल्या दराने खरेदी करण्याचा कंपनी करार करते.
जनावरे रोडवर सोडली तर होणार गुन्हा दाखल! नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल
तयार झालेली वीज मोजून कंपनीला देण्याची सोय असते आणि ठरवून दिलेल्या दराने रक्कम मिळते. आता दिवसेंदिवस घरगुती, औद्योगिक तसेच शेतीसाठी विजेचा वापर वाढणार आहे. यामुळे हे फायदेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकरी नेते राजू शेट्टी यांची केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार, विमान प्रवासात घडला धक्कादायक प्रकार
जनावरांचा बाजार शुक्रवारपासून सुरू, शेतकरी व्यापाऱ्यांना दिलासा..
कोरोना पुन्हा वाढला! केंद्रीय मंत्र्यांचे मास्क सक्तीबाबत मोठे वक्तव्य
Share your comments