Solar Energy Business : 'या' चार सोलर व्यवसायातून मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न

22 April 2020 12:31 PM


केंद्र आणि राज्य सरकार सौर व्यवसायासाठी आग्रही आहेत.  कृषी सौर पंप योजना भारतातील अनेक राज्यांमध्ये जोरात सुरू आहेत.  यामुळे सौर पॅनेल किंवा सौर व्यवसाय हा आजच्या काळातील सर्वात फायदेशीर व्यवसाय झाला आहे. सोलर पॅनल सध्याच्या घडीला आणि भविष्यातील सर्वाधिक नफा देणारा व्यवसाय झाला आहे.  अनेक व्यवसायिकांना ही नस पकडत  सोलर पॅनलचा व्यवसाय सुरू केले आहेत.  जर आपल्यालाही हा व्यवसाय करायचा असेल तर आपणही हा व्यवसाय करु शकता.  हा व्यवसाय सुरू करण्याआधी याविषयीच्या काही टिप्स आपल्याला जाणून घ्या लागतील.  सोलर संबंधीचे व्यवसाय सुरू करून आपण मोठा नफा कमावू शकता.  आज  या लेखातून तुम्हाला या व्यवसायाच्या काही टिप्स आम्ही देत आहोत.

(Solar Energy Business in India) भारतातील सौर उर्जा व्यवसाय:

Earn up to 1 Lakh Rupees by Selling These Products

 उत्पादनांची विक्री करुन मिळवा १ लाख रुपयांचे उत्पन्न

सरकार सोलर प्लांट बसविण्यावर जोर देत आहे. बर्‍याच राज्यांत औद्योगिक क्षेत्रात सौर प्रकल्प स्थापित करणे आवश्यक झाले आहे. दरम्यान सरकार सोलर प्लांट बसविण्यावर जोर देत आहे. अनेक राज्यातील औद्योगिक क्षेत्रात सोलर प्लांट बसविणे आवश्यक आहे. यामुळे सोलर वस्तू विक्री करण्याचा व्यवसाय आपण सुरू करु शकता. यामध्ये तुम्ही सोलर पीव्ही, सोलर अॅटिक फॅन(Solar Attic Fane) , सोलर थर्मल सिस्टम (Solar Cooling System), सोलर कूलिंग सिस्टम (Solar Cooling System) चा व्यवसाय सुरू करू शकता. यातून तु्म्ही लाखों रुपयांची कमाई करू शकता. विशेष म्हणजे सोलर संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकां आपल्याला कर्जही देत आहेत.

(Start a business by becoming a solar consultant ) सौर सल्लागार बनून व्यवसाय सुरू करा

सौर सल्लागार म्हणून पण तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. पण यासाठी तुम्हाला तांत्रिक बाबींची माहिती असणं आवश्यक आहे.  हा व्यवसायासाठी तुम्हाला थोडा खर्च करावा लागेल. साधारण तुम्हाला २ लाख रुपयांपर्यंतचा खर्च येईल. यातून मिळणार नफा ५० हजारांपेक्षा अधिक असतो.


सौर अंतर्गत आपण देखभाल व स्वच्छता केंद्र (maintenance and cleaning centre) देखील उघडू शकता. अशा प्रकारे आपण सौर पॅनेलच्या मालकांना नियमित सेवा देऊ शकता. याशिवाय, देखभाल-व्यवसाय सुरू करुन आपण सौर उत्पादने आणि इन्व्हर्टर दुरुस्त करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे ५० हजार रुपये खर्च येणार आहे.

हा व्यवसाय सुरू करा

बाजारात अशी अनेक उत्पादने आहेत जी सौर ऊर्जेवर चालतात. यातून तुम्ही एक व्यवसाय सुरू करू शकता. मोबाइल चार्जर, सौर वॉटर हीटर, सोलर पंप, सौर दिवे. बर्‍याच देशी-परदेशी कंपन्या या उत्पादनांवर काम करतात. शिवाय सरकार वॉटर हीटर आणि पंपवरही अनुदान देत आहे.

central and state governments agricultural solar pump schemes Solar Energy Business in India Solar Businesses government provides subsidy for solar business केंद्र सरकार आणि राज्य सरकारची योजना सौर कृषी पंप सौर ऊर्जा व्यवसाय सरकारकडून सौर ऊर्जा व्यवसायाला सरकारकडून सब्सिडी
English Summary: Solar Energy Business in India: Start These 4 Solar Businesses and Earn Profit in Millions

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.