1. कृषी व्यवसाय

अगदी 5 ते 10 हजार रुपयांमध्ये हँडवॉश व्यवसाय सुरू करा अन मिळवा प्रतिमहिना 25 ते 30 हजार

प्रदूषनाणे भरलेल्या या युगात काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्या आधी हात स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ही सवय आपल्याला अनेक आजारांपासून वाचवते. यासाठी बाजारात अनेक प्रकारचे हँडवॉश साबणही विकले जातात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
handwash making bussiness is so profiatble and get more income bussiness

handwash making bussiness is so profiatble and get more income bussiness

प्रदूषनाणे भरलेल्या या युगात काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्या आधी हात स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ही सवय आपल्याला अनेक आजारांपासून वाचवते. यासाठी बाजारात अनेक प्रकारचे हँडवॉश साबणही विकले जातात.

. या हँडवॉश ची किंमत साधारणत: कोणत्याही सामान्य साबना पेक्षा खूप जास्त असते, ज्यामुळे कंपन्या खूप नफा कमावतात. हॅन्ड वॉश चा व्यवसाय अगदी कमी खर्चात सुरू करता येतो आणि तो बाजारात अगदी सहज विकता येतो.

1) हँडवॉश साठी आवश्यक साहित्य :

 घरी बसून हँडवॉश बनवण्यासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध होते. त्याचे आवश्यक घटक खालील प्रमाणे आहेत.

1) शुद्ध पाणी

2) सुगंध

3) रंग

4) सीएलपीबी

5) सोडियम लॉरील सफेट (sls)

6) कॅडमियम (CD)

7) मीठ

 हा उद्योग सुरू करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चामाल अगदी सहज उपलब्ध होतो. यासाठी लागणारे शुद्ध पाणी कोणत्याही वाटर प्लांटमधून कमीत कमी खर्चात मिळू शकतो. यासोबतच त्यात वापरलेले मीठ आणि रंगही सहज मिळू शकतो. यानंतर आवश्यक रासायनिक पदार्थ जसे की सीएलपीबी, कॅडमियम,एसएलएस,आणि परफ्यूम इत्यादी कोणत्याही रासायनिक वस्तूंच्या दुकानात मिळतील.

2) प्रति एक लिटर हँडवॉश तयार करण्यासाठी :(Making Process Of 1Liter Handwash)

1) सर्वप्रथम, 850 ग्रॅम शुद्ध पाण्याचे वजन करा आणि ते वेगळ्या प्लास्टिकच्या बादलीत काढा.

2)पाण्याचे वजन केल्यानंतर,sls 50 ग्रॅम च्या आसपास मोजा. sls ( सोडियम लॉरील सल्फेट ).

3) हँडवॉश मध्ये तुमच्या आवडीचा सुगंध घालण्यासाठी, तुमच्या आवडीचा 2 ते 3 ग्रॅम सुगंध sls मध्ये टाका आणि ते चांगले मिसळा.

4) आता मिश्रित sls आणि परफ्युम मोजलेल्या 850 ग्रॅम पाण्यात टाका.

5) हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये टाका आणि एकजीव होऊ द्या. यादरम्यान परफ्युम एसएलएस आणि पाणी चांगले मिसळले जाते. आता ते मोजा आणि सीएलपीबी सुमारे 20 ग्रॅम ठेवा.

6) यानंतर मिसळलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये 20 ग्रॅम कॅडमियम घाला.

7) या मिश्रणात तुमच्या आवडीचा रंग घाला. मिश्रण तयार असताना रंग टाकल्यावर रंग चांगला मिसळतो.

8)या नंतर त्यात मीठ टाकले जाते. मीठ घालण्याचे मुख्य कारण म्हणजे मिश्रणाची एकाग्रता किंवा चिकटपणा वाढवणे. मीठ एकत्र घालू नका. एकाग्रता किंवा सुसंगतता वाढवण्यासाठी हळूहळू मीठ घाला आणि आवश्‍यकतेनुसार मिश्रण तयार करा.

9) हे मिश्रण आठ ते दहा तास असेच राहू द्या. अशाप्रकारे तुमचा हँडवॉश तयार होतो.

3) लागणारा खर्च:(Capital)

 हँडवॉश बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीच्या काळात 5000 ते 10000 रुपये खर्च येऊ शकतो. पण हळूहळू तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला तुमचे बजेट वाढवावे लागेल.

4) मशिनरी :(Machinary)

 व्यवसायाच्या सुरुवातीला मशीन विकत घेता येत नसतील तर काही दिवस मजुर ठेवून मिक्सिंग करता येते. पण उत्पादन वाढवण्यासाठी मशीन ची गरज असते. मशीन पैकी एक मिक्सर आहे आणि दुसरे पॅकेजिंग आणि सिलिंग मशीन आहे. साधे मिक्सर मशीन 2000 - 3000 रुपयांपासून सुरू होते.

5) व्यवसायाची नोंदणी:(Registration Of Occupation)

 या व्यवसायासाठी अनेक ठिकाणचा परवाना लागतो. जेव्हा  व्यवसाय वाढू लागतो, तेव्हा तुमचा व्यवसाय ROC अंतर्गत नोंदणी करा. कंपनीचे पॅन कार्ड तयार करा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संमती मंजुरीसाठी अर्ज करा.

 यानंतर ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड मध्ये तुमच्या कंपनीच्या उत्पादनासाठी lsl ट्रेडमार्कसाठी अर्ज करा. ह्या ट्रेडमार्क मुळे लोकांमध्ये तुमच्या कंपनीच्या उत्पादनाची विश्वासाहर्ता वाढते.

6) लागणारी जागा:

 हा व्यवसाय सुरु करण्याची सर्वात सोपी गोष्ट म्हणजे त्यासाठी जास्त जागा लागत नाही. कमी जागेतही चांगले उत्पादन बनवता येते. कालांतराने, व्यवसायाच्या विकासाबरोबरच, जागा वाढवण्याची आवश्यकता असू शकते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 200sq ft जागा आवश्यक आहे.

7) पॅकेजिंग :(Packing)

 हँडवॉश तयार झाल्यावर, मार्केटिंगसाठी त्याच्या पॅकेजचे आकर्षक स्वरूप असणे देखील आवश्यक आहे. आकर्षक पॅकेज बनवण्यासाठी अनेक स्टायलिश बॉक्स परवडणार्‍या किमतीत उपलब्ध आहेत. हे बॉक्स अधिक संख्येने विकत  घेतल्यास ही किंमत आणखी खाली येते. तुमचे ब्रॅण्डिंग या बॉक्सवर केले जाऊ शकते. सर्वप्रथम तुमच्या पॅकेजच्या रणनीती नुसार वेगवेगळ्या आकारात डबे खरेदी करा. आपण 250 मिग्रॅ. ते 1 लिटरपर्यंत पॅकेज बनवू शकता.

8) मार्केटिंग :(Marketing)

 सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही बनवलेल्या हॅन्ड वॉश चे ब्रँडिंग. पॅकेटवर तुमचे निवडलेले नाव आणि तुमच्या कंपनीचा लोगो तयार करणे महत्त्वाचे आहे. ब्रँडिंग साठी कंपनी नोंदणी आवश्यक आहे. सुरुवातीच्या काळात नोंदणी न करताही काम सुरु करता येते,परंतु व्यवसाय वाढवताना नोंदणी करणे बंधनकारक होते. तुमच्या ब्रँडचे नाव बाजारात लोकप्रिय करण्यासाठी काही पोस्टर्स लावले जाऊ शकतात. तसेच सुरुवातीला तुमचे हँडवॉश इतर हँडवॉश कंपन्यांच्या तुलनेत कमी किमतीत विकले जाऊ शकतात, जेणेकरून अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करता येईल. तुम्ही तुमच्या कंपनीच्या नावाने ऑनलाईन वेबसाईट तयार करून तुमच्या ब्रँडची जाहिरात देखील करू शकता.

9) हॅन्ड वॉश मधून होणारे प्रॉफिट :

 हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्ही कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवू शकता.

या व्यवसायात तुम्ही जितक्या जास्त प्रमाणात हँडवॉश बनवाल तितका तुम्हाला फायदा होईल. जर मशीनची संख्या जास्त असेल तर आणि कच्चामाल जास्त असेल तर तुमचा नफा ही वाढत जाईल, या व्यवसायाद्वारे आपण महिन्याला जवळपास 25,000 ते 30,000 रुपयांपर्यंत कमवू शकता. (स्तोत्र-मराठीउद्योजक)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Great Bussiness Idea:'या' व्यवसायांना कच्चामाल पुरवून तुम्ही उभारू शकता तुमचा चांगला व्यवसाय

नक्की वाचा:मोठ्या लोकांना सोडता आणि शेतकऱ्यांना पिडता, न्यायालयाने बँक ऑफ महाराष्ट्रला झापले

नक्की वाचा:Amazon Fresh Offer: फक्त एका रुपयामध्ये एक किलो पीठ, इतर किराणा सामानावर देखील मोठी ऑफर

English Summary: handwash making bussiness is so profiatble and get more income bussiness Published on: 17 May 2022, 09:39 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters