1. कृषी व्यवसाय

आधुनिक गुऱ्हाळा चा वापर करून तयार करा सेंद्रिय गूळ

कोल्हापूर जिल्हा हा ऊस तसेच गुळासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. तिथे एक कणेरी मठ आहे ज्या मठाचे स्वतःचे कृषी विज्ञान केंद्र देखील आहे. कृषी विज्ञान केंद्राने ग्राहकांची मागणी पाहून स्वतः गुळनिर्मिती केंद्र उभारले त्यासाठी त्यांनी ३५ लाख रुपये खर्च करून आधुनिक गुऱ्हाळ उभारला आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
jaggery

jaggery

कोल्हापूर जिल्हा हा ऊस तसेच गुळासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. तिथे एक कणेरी मठ आहे ज्या मठाचे स्वतःचे कृषी विज्ञान केंद्र देखील आहे. कृषी विज्ञान केंद्राने ग्राहकांची मागणी पाहून स्वतः गुळनिर्मिती केंद्र उभारले त्यासाठी त्यांनी ३५ लाख रुपये खर्च करून आधुनिक गुऱ्हाळ उभारला आहे.

पारंपरिक गुऱ्हाळ साठी कमीत कमी एक एकर जमीन लागते तसेच १५ ते २० मजूर सुद्धा लागतात पण या मठाणे आधुनिक गुऱ्हाळ उभारण्यासाठी वेगवेगळे यंत्राचे जुगाड करून फक्त चार ते पाच गुंठ्यात उभारले आहे आणि गुळाची निर्मिती करण्यासाठी फक्त सहा मजूर लागतात.

प्रक्रियानिर्मिती -

पारंपरिक गुऱ्हाळ मध्ये चिपाड वाळवण्यासाठी खूप वेळ लागत होता पण या आधुनिक गुऱ्हाळमध्ये चिपाड वाळवण्यासाठी त्यांनी ४० फूट लांबीचा लोखंडी टायर बसवलेला आहे तो लोखंडी टायर चुलवणातील उष्णता खेचून घेतो आणि कमीत कमी २० ते ३० मिनिटांमध्ये ते चिपाड वाळवितो.क्रशर ते ड्रायर च्या दरम्यान सेटअप बसवला गेला आहे. जेव्हा घाण्यात चिपाड टाकले की त्याचा रस आणि चिपाड वेगळे होते आणि जो तयार झालेला रस आहे तो मोटरच्या साहाय्याने पहिल्या कढई मध्ये टाकला जातो तर चिपाड सुद्धा ड्रायर कडे नेले जाते. पहिल्या काहिली मध्ये पंधरा तर दुसऱ्या काहिली मध्ये तीस टक्के रस तापवला जातो.

हेही वाचा:करा स्ट्रॉबेरी फळांपासून प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती

आधुनिक गुऱ्हाळाचे फायदे -

  • आधुनिक गुऱ्हाळ मध्ये फक्त सहा मजूर लागत पण जुन्या गुऱ्हाळ मध्ये १५ मजूर लागत आहेत. तसेच आधुनिक गुऱ्हाळ मध्ये सर्व प्रक्रिया अगदी जलद पणे होते पण जुन्या गुऱ्हाळमध्ये ऊस गाळला की पडलेले चिपाड गोळा करणे ते चिपाड लांब नेहून वाळवणे. ते वाळलेली चिपाड परत गोळा करून आणने आणि चुलीमध्ये टाकणे. पण आधुनिक गुऱ्हाळ मध्ये कमी वेळेत सर्व होत आहे.
  • जुन्या गुऱ्हाळ मध्ये एक आधण येण्यासाठी तीन तास लागतात पण आधुनिक गुऱ्हाळ मध्ये तीन काहिली चा वापर केला की वेळेची बचत होते तसेच १२५ ते      १५० किलो गूळ तयार होतो.
  • जुन्या गुऱ्हाळाला एक एकर पर्यंत जागा लागते पण आधुनिक गुऱ्हाळाला सर्व यंत्रासाठी चार ते पाच गुंठे जागा लागते.
  • जुन्या पद्धतीमध्ये चिमनीमधून ज्वाला वाया जात होते पण आधुनिक पद्धतीमध्ये ज्वाला ड्रायर साठी वापरतात. जुन्या पद्धतीमध्ये एकदा वापरलेले चीपाड पूर्ण वाळल्याशिवाय पुन्हा वापरता येत नाही तर आधुनिक पद्धतीमध्ये ड्रायर च्या साहाय्याने चिपाड वाळवून वापरता येते.

आधुनिक गुऱ्हाळ साठी गुंतवणूक -

आधुनिक गुऱ्हाळ उभारायचे असेल तर त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च येतो. ३५ लाख मधील १८ लाख रुपये त्यासाठी लागणाऱ्या यंत्र सामग्री साठी लागतात तर उर्वरित बांधकाम तसेच खाजगी यंत्रणा साठी बाकीचा खर्च लागतो.

English Summary: Make organic jaggery using modern method Published on: 22 July 2021, 07:18 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters