1. कृषी व्यवसाय

शेतकऱ्यांनो लवंग, वेलची 'या' मसाला पिकांची शेती करून कमवा लाखों रुपये; जाणून घ्या

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिकांची शेती करून चांगले उत्पादन घेत असतात. मात्र शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे आज आपण अधिक उत्पादन मिळेल अशा पिकांविषयी माहिती जाणून घेऊया.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
cloves cardamom

cloves cardamom

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिकांची शेती (crops farming) करून चांगले उत्पादन घेत असतात. मात्र शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे आज आपण अधिक उत्पादन मिळेल अशा पिकांविषयी माहिती जाणून घेऊया.

शेतकऱ्यांना मसाला पिकाची शेती (agriculture) मालामाल बनवू शकते. विशेष म्हणजे बाजारपेठेसह अन्य देशांनाही भारतीय मसाले निर्यात केले जात आहेत. या मसाला पिकांमध्ये मिरची, हळद, लसूण, आले, धणे, जिरे, काळीमिरी, बडीशेप, दालचिनी, जायफळ, अजवायन, लवंग या पिकांचा समावेश होतो.

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक! गॅस सिलिंडरची किंमत 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

1) वेलची - वेलची या मसाला पिकाचा उपयोग खाण्यासाठी, तसेच आरोग्यासाठी उपयुक्त औषध तयार करण्यासाठी केला जातो. यासह मसाले भाज्या तयार करतांना किंवा मिठाईमध्ये देखील वेलचीचा अधिक वापर होतो. त्यामुळे याला जास्त मागणी आहे.

2) जिरं - महत्वाचे म्हणजे मसाला पिकांमध्ये जिर्‍यांच स्थान मोलाचे आहे. त्यामुळे भाज्यांना फोडणी देण्यासाठी जिर्‍याचा वापर असतो म्हणजे असतोच.

3) बडीशेप - बडीशेप या मसाला पिकाचा (crops) मुख्यत्वे मुखसुगंधीसाठी उपयोग होतो. याचबरोबर मसाले भाज्या करतांना बडीशेपचा वापर केला जात असल्याने बडीशेपला मोठी मागणी असते. त्यामुळे या मसाला पिकातून तुम्हाला अधिक उत्पादन मिळू शकते.

सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना फटका; गहू, पीठ, तांदूळ दरात मोठी वाढ

4) धणे - विशेष म्हणजे मसाले भाज्या तयार करतांना त्यास विशिष्ट चव येण्यासाठी धण्याची फोडणी दिली जाते. पित्तनाशक म्हणून देखील धणेपुडाचा वापर केला जातो. त्यामुळे याला सुद्धा अधिक मागणी असते.

5) लवंग - जेवणातील पदार्थांना चव देण्यासाठी आणखी एका पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तो म्हणजे लवंग. याशिवाय औषधी (Medicinal) म्हणून देखील याचा वापर आयुर्वेदात केला जातो. विशेषत: दातदुखीवरील औषधे, पोटाच्या विकारांवरील औषधांचा यात समावेश होतो. लागवडीबाबत माहितीसाठी तुम्ही गुगल सर्च करू शकता.

महत्वाच्या बातम्या 
सामान्य गव्हापेक्षा काळ्या गव्हाची किंमत 4 पट जास्त; शेतकरी होणार मालामाल
आहारात या 6 फळांचे सेवन करा; रक्ताच्या नसा साफ होतील, हार्ट अटॅकचा धोखाही टळेल
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत FD पेक्षा जास्त परतावा; घ्या असा लाभ

English Summary: Farmers earn lakhs rupees farming spice crops cloves cardamom Published on: 03 October 2022, 04:04 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters