1. आरोग्य

कोरफड एक औषधी वनस्पती, आरोग्यासाठी आहे उपयुक्त

KJ Maharashtra
KJ Maharashtra
alovera

alovera

 आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व असलेल्या कोरफडीचे मूळ उगमस्थान आफ्रिका व भारतात आहे. ही बहुवार्षिक वनस्पती आहे. कोरफड मध्ये अनेक औषधी गुण आहेत. इतकेच काय आयुर्वेद, चिनी हर्बल मेडिसिन आणि ब्रिटिश हर्बल मेडिसिन यांनी कोरफडीच्या औषधी गुणांची वकिली केली आहे. या वनस्पतीची पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या स्वरूपात साचलेले असते.

 पाने लांबट असतात व खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी 45 ते 60 सेंटिमीटर व रुंदी पाच ते सात सेंटिमीटर असते. कोरफडीच्या पानांच्या  कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यभागातून एक लालसर उभा दांडा दिसतो व त्यावर केशरी रंगाची फुले येतात. जेव्हा आपण या व्यतिरिक्त याच्या औषधी गुणा विषयी  बोलतो तेव्हा या वनस्पतीच्या आणखी एका भागाविषयी आपण माहिती घेतली पाहिजे. तो भाग म्हणजे स्याप हा पिवळ्या रंगाचा द्रव्य असतो. हे आतल्या बाजूला रोपाच्या त्वचेला चीटकलेले असते. जर आपला चेहरा कोरडा पडला असेल तर त्यासाठी हा द्रव लावला जातो. अशा या उपयुक्त कोरफडीच्या आरोग्यदायी फायद्याविषयी या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

 कोरफडीचे आरोग्यदायी फायदे

  • कोरफडीचे ऍलोओईल ( 20 ते 22 टक्के ) बारबोलीन ( चार ते पाच टक्के ) तसेच शर्करा डिझाईन व इतर औषधी रसायने असतात.
  • कोरफड ही शीतल, कडू, मधुर, पुष्टिकर,बनकर असे  विशेष गुणधर्म आहेत.
  • कोरफडीच्या रसायनापासून कुमारी आसव बनवितात. शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे.
  • कोरफडीपासून बनविण्यात येणारे तेल केसांसाठी फार उपयुक्त आहे. यात तेलाचा उपयोग केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी, केस काळे व चकाकी आणण्यासाठी करतात.
  • त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावावा.
  • कोरफडीचा गर पोटदुखी, अपचन, पित्त विकार यावर सुद्धा उपयोगी आहे.
  • डोळ्यांच्या विकारावर कोरफड उपयोगी आहे.
  • भाजल्यामुळे झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी आहे.
  • सौंदर्यवृद्धीसाठी कोरफडीचा गराचा उपयोग करतात.
  • कोरफडीच्या रसात जिवाणू प्रतिकारक शक्ती असते. कोरफडीच्या पानात येलोईन व ब्राबोबोलीन हे मुख्य ग्लुकॉसाईन असतात.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters