1. कृषीपीडिया

Fennel Farming: बडीशेप लागवड शेतकऱ्यांसाठी ठरू शकते वरदान! जाणुन घ्या याविषयी

भारतात खूप मोठ्या प्रमाणात मसाला पिकांची लागवड (Cultivation of spice crops) नजरेस पडते. मसाला पिकांची लागवड करून शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई करत आहेत. मसाला पिकांची बारामाही मागणी असल्याने या पिकांची शेती शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरू शकते. अशाच मसाला पिकांपैकी एक पिक आहे बडीशेपचे (Fennel Crop) हे देखील एक महत्त्वपूर्ण मसाला पीक आहे. बडीशेप साठी संपूर्ण भारतात अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले जाते, राज्यात देखील बडीशेप पिकासाठी अनुकूल वातावरण आहे (The Maharashtra state also has a favorable environment for Fennel crop).

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
fennel crop [ image courtesy- harvesttotable ]

fennel crop [ image courtesy- harvesttotable ]

भारतात खूप मोठ्या प्रमाणात मसाला पिकांची लागवड (Cultivation of spice crops) नजरेस पडते. मसाला पिकांची लागवड करून शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई करत आहेत. मसाला पिकांची बारामाही मागणी असल्याने या पिकांची शेती शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरू शकते. अशाच मसाला पिकांपैकी एक पिक आहे बडीशेपचे (Fennel Crop) हे देखील एक महत्त्वपूर्ण मसाला पीक आहे. बडीशेप साठी संपूर्ण भारतात अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले जाते, राज्यात देखील बडीशेप पिकासाठी अनुकूल वातावरण आहे (The Maharashtra state also has a favorable environment for Fennel crop).

बडीशेपची लागवड मुख्यता रब्बी हंगामात करण्याची शिफारस केली जाते. बडीशेप पिकाला जास्त पावसामुळे नुकसानीचा धोका असतो त्यामुळे याची लागवड रब्बी हंगामात करण्याची शिफारस केली जाते. शिवाय रब्बी हंगामात रोगराईचा प्रसार हा जवळपास नगण्य असतो त्यामुळे बडीशेप लागवड रब्बी हंगामात केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त होते. शेतकरी मित्रांनो आज आपण रब्बी हंगामात बडीशेप लागवड नेमकी कशी करायची तसेच बडीशेप पिकासाठी उपयुक्त जमीन आणि हवामान. शिवाय बडीशेप पिका पासून मिळणारे उत्पन्न याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया बडीशेप शेती विषयी महत्त्वपूर्ण बाबी.

बडीशेप पिकासाठी जमीन व पूर्व मशागत

बडीशेप पिकाची लागवड चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत (In well drained soils) केल्यास उत्पादन चांगले मिळते. बडीशेप लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्वमशागत (Pre-cultivation) करणे महत्त्वाचे असते. जमिनीची पूर्वमशागत साठी सर्वप्रथम जमीन दोन-तीन वेळा चांगली नांगरुन भुसभुशीत करून घ्यावी, त्यानंतर फळी मारून जमीन सपाट करण्यात यावी. जमीन सपाट केल्यानंतर मागील हंगामातील पिकांचे अवशेष गोळा करून जाळून टाकावे. पूर्व मशागत केलेल्या जमिनीत बडीशेप लागवड साधारणतः ऑक्‍टोबर महिन्यात केली जाते. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बडीशेप लागवड केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त होत असल्याचे सांगितले जाते. बडीशेपचे रोप निर्मितीसाठी रोपवाटिकेत बडीशेपच्या बियाण्यांची पेरणी जुलै ते ऑगस्ट या दरम्यान केली जाते, दोन महिन्यात बडीशेप ची रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की रोपवाटिकेत पेरणी करण्यापूर्वी बडीशेप बियाण्यांवर बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे ठरते. बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये अन्यथा रोप अंकुरण होण्यास उशीर होऊ शकतो शिवाय त्यामुळे अनेक रोग रोपांना लागू शकतात. बीजप्रक्रिया करण्यासाठी बाविस्टीन (Bavistein) नामक रासायनिक औषध एक किलो बियाण्यासाठी दोन ग्रॅम या प्रमाणात घेऊन बीजप्रक्रिया करावी. आपण सेंद्रिय पद्धतीने देखील बीजप्रक्रिया करू शकता यासाठी सेंद्रिय बुरशीनाशक ट्रायकोडर्मा दहा ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापरून बिजप्रक्रीया करा.

बडीशेपच्या सुधारित जाती

भारतात बडीशेप च्या भरपूर सुधारित जाती विकसित केल्या गेल्या आहेत मात्र त्यापैकी RF-105, RF-125, PF-35, गुजरात सौन्फ-1, गुजरात सौन्फ-2, गुजरात सौन्फ-11, CO-11, हिसार स्वरूप, NRCS SSAF-1 या जातींची लागवड भारतात मुख्यतः केली जाते. या सुधारित जाती पैकी कुठल्याही एका जातीची लागवड करून शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई करू शकता.

बडीशेपपासून मिळणारे उत्पादन

बडीशेप पिकातून सुधारित जातींची लागवड (Cultivation of improved varieties) करून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. शेतकरी बांधवांनो जर आपण जिरायती जमिनीत बडीशेप लागवड केली तर आपणास सुमारे एकरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन प्राप्त होऊ शकते. उत्पादनात परिस्थितीनुसार बदलत्या हवामानानुसार तसेच पिकाचे व्यवस्थापन अनुसार थोड्याफार प्रमाणात चढ-उतार बघायला मिळू शकते.

English Summary: start fennel cultivation and earn lots of money Published on: 08 January 2022, 08:48 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters