Business Idea: मित्रांनो महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, सामान्य माणूस यामुळे पुरता भरडला जात असल्याचे चित्र आहे. खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांच्या (Farmer) शेतीमालाला कवडीमोल दर मिळत आहे. कांदा पीक तर अतिशय नगण्य दरात विक्री होत आहे. त्यामुळे आज आम्ही शेतकरी बांधवांसाठी खास शेती मधला व्यवसाय (Agri Business) घेऊन हजर झालो आहोत.
मित्रांनो आज आपण कांद्या पासून तयार होणारे बायप्रॉडक्ट कांदा पेस्टचा व्यवसाय (Onion paste making business) व त्यामधील बारकावे घेऊन हजर झालो आहोत.
मित्रांनो कांदा पेस्ट मेकिंग बिजनेस हा कोणीही सुरू करू शकतो मात्र शेतकऱ्यांसाठी यामध्ये अधिक फायदा आहे. शेतकरी बांधवांना कच्चामालाची कुठेही शोधाशोध करण्याची गरज भासणार नसल्याने हा व्यवसाय (Business) त्यांच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.
जाणकार लोकांच्या मते, जेव्हा तेजी असते तेव्हा शेतकरी बांधवांनी कांदा (Onion crop) थेट बाजार पेठेत न्यावा मात्र जेव्हा मंदी असते तेव्हा त्यावर प्रक्रिया करून बायप्रॉडक्ट (Onion byproduct) निर्मिती केल्याने त्यांना फायदा होणार आहे.
अशा पद्धतीने सध्या कांद्याला कवडीमोल बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी बांधव कांद्याची पेस्ट तयार करून लाखो रुपयांची कमाई करू शकणार आहेत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या व्यवसायाविषयी काही महत्वाच्या बाबी.
या व्यवसायासाठी किती खर्च येईल बर…!
खादी ग्रामोद्योग आयोग (KVIC) ने कांद्याची पेस्ट बनवण्याच्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यानुसार हा व्यवसाय 4.19 लाख रुपयांमध्ये सुरू करता येईल.
तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसल्यास तुम्ही सरकारच्या मुद्रा योजनेतून कर्ज घेऊ शकता. KVIC च्या अहवालानुसार, कांदा पेस्ट उत्पादन युनिट उभारण्यासाठी एकूण खर्च 4,19,000 रुपये आहे.
यामध्ये इमारत शेड बांधण्यासाठी 1 लाख रुपये आणि उपकरणसाठी (तळण्याचे पॅन, ऑटोक्लेव्ह स्टीम कुकर, डिझेल भट्टी, निर्जंतुकीकरण टाकी, छोटी भांडी, मग, कप इत्यादी) 1.75 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
याशिवाय व्यवसाय चालवण्यासाठी 2.75 रुपये लागतील. या युनिटच्या माध्यमातून वर्षभरात सुमारे 193 क्विंटल कांद्याची पेस्ट तयार करता येते. 3,000 रुपये प्रति क्विंटल बाजारात कांदा पेस्टची किंमत पकडल्यास 5.79 लाख रुपये होतील.
किती कमाई होणारं जाणून घ्या…!
अहवालानुसार, जर तुम्ही पूर्ण क्षमतेने कांद्याची पेस्ट तयार केली तर तुम्ही एका वर्षात 7.50 लाख रुपयांची विक्री करू शकता. यातून सर्व खर्च वजा केल्यास निव्वळ नफा 1.48 लाख रुपये असू शकतो.
Share your comments