1. बातम्या

शेतकरी मित्रांनो 'या' जातीच्या देशी कोंबड्या पाळून मिळवा बंपर नफा; जाणून घ्या

शेतकरी शेतीसोबत अनेक छोटे-मोठे जोडव्यवसाय करत असतात, ज्यातून त्यांचे आर्थिक उत्पन्न चालू राहते. आपण पाहिले तर ग्रामीण भागातील शेतकरी पशुपालन व कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत असतात.

Farmer bumper profit

Farmer bumper profit

शेतकरी शेतीसोबत अनेक छोटे-मोठे जोडव्यवसाय (attachment business) करत असतात, ज्यातून त्यांचे आर्थिक उत्पन्न चालू राहते. आपण पाहिले तर ग्रामीण भागातील शेतकरी पशुपालन व कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत असतात.

ग्रामीण भागात कुक्कुटपालन हा एक लोकप्रिय व्यवसाय आहे. कुक्कुटपालन व्यवसायातून (Poultry business) तुम्ही चांगले उत्पन्न घेऊ शकता. कुक्कुटपालनात फार मोठी गुंतवणूक न करताही व्यवसाय (business) सुरु करता येतो. शिवाय या व्यवसायात गुंतवणुकीपेक्षा दुप्पटीने नफा मिळण्याची दाट शक्यता असते.

विशेष म्हणजे या व्यवसायासाठी सरकार अनुदान देखील देते. तसेच आपण आज काही देशी जातीच्या कोंबड्यांची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यातून तुम्ही कमी कालावधीत चांगला नफा मिळवू शकता.

आता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार; शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने घेतला 'हा' मोठा निर्णय

ग्रामप्रिया

कोंबडीची ही जात अंडी आणि मांस दोन्ही देते. यांचे मांस तंदूरी चिकन बनवण्यासाठी जास्त वापरले जाते. ग्रामप्रिया कोंबडीची वर्षभरात सरासरी २१० ते २२५ अंडी घालण्याची क्षमता आहे.

श्रीनिधी

श्रीनिधी कोंबडी देखील मांस आणि अंडी या दोन्हीद्वारे अधिक नफा मिळवू शकतात. या जातीची कोंबडी फार लवकर विकसित होते आणि फार कमी वेळात चांगला नफा मिळवून देते. या कोंबडीच्या पालनाने चांगले उत्पन्न मिळू शकते.

Agriculture Cultivation: 'या' शेतीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मिळेल बंपर नफा; जाणून घ्या सविस्तर

वनराजा

देशी कोंबड्यांमध्ये वनराजा सर्वोत्तम मानला जातो. या कोंबड्या १२० ते १४० अंडी घालतात. ही कोंबडी पाळल्यास कमी वेळात चांगला नफा मिळू शकतो. घरगुती कुक्कुटपालनाचे फायदे देशी कोंबड्यांचे आणि कोंबड्यांचे मांस अतिशय चवदार आणि पौष्टिक असल्याने त्यास बाजारात मोठी मागणी असते.

महत्वाच्या बातम्या 
Use Fertilizers: शेतकरी मित्रांनो खते वापरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा होईल मोठे नुकसान
Walnut Cultivation: अक्रोडाच्या लागवडीतून शेतकरी होतील करोडपती; जाणून घ्या संपूर्ण पद्धत
शेतकऱ्यांना 'या' योजनेतून मिळणार 65 हजार मानधन; अंतिम मुदत 22 ऑगस्ट, त्वरित घ्या लाभ

English Summary: Farmer bumper profit rearing indigenous chickens breed Published on: 18 August 2022, 04:59 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters