1. बातम्या

Market News: 'या' बाजार समितीमध्ये टोमॅटो लिलावाचा शुभारंभ,मिळाला चांगला भाव,वाचा तपशील

महाराष्ट्रामध्ये टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु यामध्ये नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्हा टोमॅटो उत्पादनाच्या बाबतीत अग्रस्थानी आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रामुख्याने कळवण, सटाणा, देवळा, येवला आणि मालेगाव इत्यादी तालुक्यांमध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. जर आपण टोमॅटोचा बाजारभावाचा विचार केला तर कधीकधी शेतकऱ्यांना खूप काही देऊन जाईल नाहीतर इतका बाजार भाव घसरतो की, शेतकरी उत्पादन खर्च तर सोडाच परंतु वाहतूक खर्च देखील निघत नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
tommato auction

नक्की वाचा:Tommato Tips:टोमॅटोच्या भरघोस उत्पादनाचे गुपित आहे रोपवाटिकेत,'या' टीप्स ठरतील महत्त्वाच्या

त्यामुळे बर्‍याचदा टोमॅटो रस्त्यावर टाकायची  वेळ येते. परंतु जर आपण सध्याच्या बाजारपेठेचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे लिलाव सुरू झाले आहेत.

 लासलगावमध्ये टोमॅटो लिलाव सुरू

 लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या लिलावाला शुभारंभ झाला असून उघड लिलावाच्या माध्यमातून टोमॅटोची विक्री होत असून स्थानिक व्यापारी आणि राज्यातील व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतल्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन त्याचा फायदा शेतकरी बंधूंना होताना दिसत आहे.

त्यामुळे शेतकरी बंधूमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नक्की वाचा:Onion Rate: कांदा दराचा प्रश्न पेटला; कांदा उत्पादक संघटनेने घेतला मोठा निर्णय

 इतका मिळाला भाव

 लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या झालेल्या लिलावामध्ये 20 किलोच्या एका क्रेटला 351 रुपये म्हणजेच एकंदरीत सरासरीचा विचार केला तर तीनशे रुपये प्रती क्रेट इतका भाव मिळाला.या सुरू झालेल्या लिलावामध्ये शेतकरी,

आडते तसेच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिल्याने बाजार भाव चांगले मिळाले, टोमॅटो उत्पादक शेतकरी बंधूंमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले.

नक्की वाचा:Shinde Goverment Decision: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ, आणखी बरंच काही

English Summary: tommato auction start in lasalgaon market and get market rate to tommato Published on: 18 August 2022, 06:56 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters