असनी चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर देखील राज्यातील बऱ्याच भागांमध्ये उष्णतेची लाट तीव्र झालेली आहे. विदर्भामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा हा 45 अंशाच्या पुढे गेला आहे.
तसेच देशातील इतर राज्यांचा विचार केला तर पंजाब, दिल्ली आणि राजस्थान या भागामध्ये मोठी उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. दिल्ली तर तापमानाचा पारा 50 अंशाच्या आसपास आहे. या सगळ्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर काल सोमवारी मान्सूनने अंदमानमध्ये धडक दिल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले व त्यासोबत काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, पुणे आणि कोल्हापूर या तेरा जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला असून महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात 17 ते 19 मे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
तसेच हवामान खात्याच्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये समुद्राला मोठी भरती येणार असल्याने मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचा फटका हा मुंबई आणि उपनगरांना बसण्याची भीतीदेखील हवामान खात्याने वर्तवली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जून आणि जुलै महिन्यामध्ये प्रत्येकी सहा दिवस आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी पाच दिवस समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता आहे.तळकोकण यामध्ये दोन जून पर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून कोकण किनारपट्टीवर तसे संकेत देखील मिळण्यास सुरुवात झाली आहे. याबाबतीत मच्छीमारांच्या माहितीनुसार समुद्रामध्ये जेव्हा फेसाच्या मोठ्या लाटा येतात तेव्हा पुढच्या दोन आठवड्यात मान्सून कोकणात सुरू होण्याची शक्यता आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले असून पुढच्या दोन दिवसांत चांगला पाऊस पाण्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाकडून देखील वर्तवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:अगदी 5 ते 10 हजार रुपयांमध्ये हँडवॉश व्यवसाय सुरू करा अन मिळवा प्रतिमहिना 25 ते 30 हजार
Share your comments