1. बातम्या

शेतकऱ्याला अश्रू अनावर! कष्टाने पिकवलेली कपाशी विकून आलेले साडेपाच लाख रुपयांची जळून राख रांगोळी

शेतात राब राब राबुन मोठ्या कष्टाने कपाशी पिकवली आणि कपाशी विकून आलेले साडेपाच लाख रुपये घराला लागलेल्या आगीत जळून राख झाले.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
home burning incident occur in jamner taluka in kunbhari sim village

home burning incident occur in jamner taluka in kunbhari sim village

 शेतात राब राब राबुन मोठ्या कष्टाने कपाशी पिकवली आणि कपाशी विकून आलेले साडेपाच लाख रुपये घराला लागलेल्या आगीत जळून राख झाले.

नुसतं वाचून किंवा ऐकून अंगावर काटे येतील अशी घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात कुंभारी सिम या गावात घडली. यामुळे या शेतकरी राजाचे जवळजवळ दहा लाखाचे नुकसान झाले असून डोळ्यात अश्रू शिवाय दुसरे काही राहिले नाही. याबाबतचे सविस्तर माहिती अशी की जामनेर तालुक्यातील कुंभारी सिम या गावचे युवराज पुंडलिक पाटील ते त्यांची पत्नी, मुलगा व मुलीसह  वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे त्यांची आठ एकर जमीन असून  16 मे रोजी रात्री त्यांच्या घराला आग लागली. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही हे सुदैवच म्हणावे लागेल. परंतु या आगीमध्ये त्यांच्या घराचे संसारपयोगी पूर्ण साहित्य जळून खाक झाले व घरात कपाशी विकून ठेवलेली साडेपाच लाख रुपयांची रोकड अर्धवट जळाली असून घरातशिल्लक असलेला सात ते आठ क्विंटल कापूस देखील जळून खाक झाला आहे.

हे सगळे कुटुंब उन्हाळा असल्यामुळे घराच्या बाहेर मोकळ्या जागेत झोपलेले असताना सोमवारी रात्री अचानक त्यांच्या घराला आग लागली व कपाशी विकून आणलेले 5 लाख 50 हजार रुपयेव शिल्लक सात ते आठ क्‍विंटल कपाशीचे जळाली.या आगीचे स्वरूप एवढे भयंकर होते की अक्खे घर जळून खाक झाले फक्त या शेतकरी राजाकडे त्यांच्या अंगावरची कपडे सोडल्यास काही शिल्लक राहिलनाही.युवराज पाटील यांनी त्यांच्या शेतीतील उत्पन्नातून मिळालेली कपाशी विकली व पैसे लागोपाठ तीन दिवस बँक बंद असल्याने घरात ठेवले होते.बँक बंद असल्यामुळे ते पैसे बँकेत ठेवता आले नाहीत.आज मंगळवारी ते पैसे बँकेत टाकणार होते परंतु नियतीला ते मान्य नव्हते.

सोमवारी विचार केला नसेल असे होत्याचे नव्हते झाले.त्यांच्याकडे जे काही होतं ते सगळं जळून खाक झाले अशा वेळीत्यांना मदत मिळावी अशी समाजातुन अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(स्रोत-जळगावLive)

 महत्वाची बातम्या                                                  

नक्की वाचा:Drip Irrigation Subsidy: शेतात बसवा ठिबक अन पाण्याची करा बचत, मिळवा 80 टक्के अनुदान

नक्की वाचा:Big Breaking: राज्यामध्ये लवकरच जिल्हा परिषदा, महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? सुप्रीम कोर्टाने दिले हे निर्देश

नक्की वाचा:महाराष्ट्रातील कांदा उत्पादक संकटात! मात्र केरळ आणि बिहार राज्यात भेटतोय कांद्याला अधिकचा दर, वाचा सविस्तर

English Summary: home burning incident occur in jamner taluka in kunbhari sim village Published on: 17 May 2022, 09:34 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters