राज्यात गेले तीन दिवस अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतीचे अजून नूकसान होण्याची शक्यता आहे. कारण राज्यात पुढील दोन दिवस पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो देण्यात आला आहे.
तसेच आजही राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम होता. उद्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तसेच रायगड, ठाणे, जालना आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पावसासाठी पूरक वातावरण निर्माण झाल्याने राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये गारवा जाणवु लागला आहे. तसेच पुढील दोन दिवसात विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
Share your comments