पाच किंवा आठ ऑक्टोबर देशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा असताना त्यातच हवामान खात्याने परतीच्या मान्सूनची तारीख दिल्याने शेतकरी अधिक चिंतेत सापडले आहेत.
ऑगस्ट महिन्याचा शेवट आला तरी विश्रांती दिलेल्या पावसाने अद्यापही हजेरी लावली नाही. त्यामुळे शेत पिकांचं नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
राज्यात एक जून ते २७ ऑगस्ट दरम्यान ७०९.५ मिलिमीटर म्हणजेच सरासरी पेक्षा आठ मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा २१ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर विदर्भात सरासरीपेक्षा ९ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यातील कोकण विभाग वगळता इतर भागात पाऊस नाही. आतापर्यंत कोकणात फक्त समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे.
मराठवाडातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचं गंभीर संकट ओढावले आहे. धरणांमधील पाणीपातळी मोठी घट झाली आहे. आठ जिल्ह्यातील ७६ तालुक्यांत यंदा पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे.
दरम्यान, राज्यातील १५ जिल्ह्यात पावसाच्या सरासरीत मोठी तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे सरासरीच्या उणे २० टक्क्यांहून अधिक तूट आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
Share your comments