Unseasonal Rain : अवकाळी पावसाने आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी बातमी आली आहे. देशात यावर्षी अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यावर्षी देशभरात सरासरीहून कमी पावसाची शक्यता आहे. देशात यावर्षी सरासरीच्या केवळ 94 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्कायमेट (Skymate) या खासगी हवामान शाळेने (Department of Meteorology) हा अंदाज वर्तवला आहे.
गेल्या चार वर्षात अल निनोमुळे (El Nino) चांगला पाऊस झाला पण यावर्षी अल निनोचा प्रभाव वाढल्यामुळे पाऊस कमी पडेल असं सांगितलं जातंय. मध्य आणि उत्तर भारतात कमी पावसाचा इशारा देण्यात आलाय. जुलै ते ऑगस्ट काळात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये कमी पावसाची शक्यता आहे.
स्कायमेट या खासगी संस्थेच्या मान्सूनबद्दलच्या प्राथमिक अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस 858.6 मिमी सरासरी राहण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची तूट बघायला मिळण्याचा अंदाज आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कसा मोजला जातो, जाणून घ्या पे मॅट्रिक्सची भूमिका...
गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तुम्ही आम्ही हे सरकार बदलू शकतो, शरद पवारांनी केले 'हे' आवाहन
Share your comments