राज्यात पुढील 2-3 दिवस हवामान संमिश्र राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
राज्यातील काही भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, राज्यातील अनेक भागामध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाचा चिंता आणखी वाढली आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात पेरण्या शेतीकामे खोळंबली आहेत.
उत्तर भारतात पावसाचा हाहाकार, यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली
आज विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर या आठवड्यामध्ये मुंबई, उपनगर परिसरात पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तर राज्यात 13 जुलैपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. तर राज्यात मुंबईसह उपनगर, ठाणे जिल्ह्यासह कोकणात चांगला पाऊस पडत आहे. तसेच अन्य काही जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे.
Share your comments