1. बातम्या

उत्तर भारतात पावसाचा हाहाकार, यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली

गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब, हरयाणा, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातील अनेक नद्यांना पूर आला आहे. नागरी भागांमध्ये पूराचं पाणी घुसल्याने असंख्य लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

North India

North India

गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब, हरयाणा, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातील अनेक नद्यांना पूर आला आहे. नागरी भागांमध्ये पूराचं पाणी घुसल्याने असंख्य लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

राज्य तसेच केंद्र सरकारकडून नागरिकांना आवश्यक मदत केली जात आहे. त्यातच आता उत्तर भारताची जीवनदायीनी असलेल्या यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी दिल्लीसह उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे हवामान खात्याने उत्तर भारतात पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांच्या चिंता वाढल्या आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून हिमाचल प्रदेश, हरयाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि काश्मिरमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं उत्तरेतील अनेक नद्यांना पूर आला आहे. धरणाच्या पाणीपातळी वाढ झाली असून हजारोंच्या संख्यने घरं पाण्याखाली गेली आहे. पूल, रस्ते पाण्याखाली गेल्याने त्याचा सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

पूरस्थिती निर्माण झाल्याने उत्तरेतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हजारो नागरिकांना राहतं घर सोडून सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा लागत आहे. लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. हिमाचलमध्ये यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात येत आहे. तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांनाही बाहेर काढण्यात येत आहे.

पंजाब आणि हरयाणातील नद्यांतून अचान मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने दिल्लीतील अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. उत्तर भारतातील पुरामुळं मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ३७ वर पोहचला आहे.

इतक्या मोठ्या प्रलयाला सामोरं जाण्याची आमची तयारी नव्हती, अशी कबुली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. दिल्ली सरकारकडून पूरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. तसेच पंजाब, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशात असंख्य एनडीआरएफच्या टीम्स तैनात करण्यात आल्या आहे.

English Summary: Rains wreak havoc in North India, Yamuna River crosses danger level Published on: 11 July 2023, 10:36 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters