Weather Update: मान्सून (Monsoon) सध्या परतीच्या दिशेने निघाल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील (Mumbai) काही भागात पाणी साचले आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीचा पाऊसही पुन्हा एकदा जोरदार बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
राज्यात काही भागात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. तसेच काही भाग अजूनही पावसाने कोरडेच ठेवले आहेत. त्यामुळे परतीच्या पावसाची आस शेतकऱ्यांना लागली आहे.
अनेक राज्यांमध्ये मान्सूनने कहर सुरूच ठेवला आहे. महाराष्ट्राची (Maharashtra) राजधानी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. त्याचवेळी, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मुंबई शहर आणि परिसरात ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा मान्सूनचे पुनरागमन होईल.
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटची नवीनतम किंमत
त्याचवेळी मुंबईत रविवारी दिवसभर आकाश ढगाळ राहिले आणि यादरम्यान शहरात हलका पाऊस झाला. त्याचवेळी, IMD ने आज दुपारी किंवा संध्याकाळी महानगर आणि परिसरात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
या भागांना यलो अलर्ट
दरम्यान आज हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार (Weather Update) मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या भागात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता असून या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
प्रतीक्षा संपणार! केंद्रीय कर्मचाऱ्यांना या दिवशी मिळणार गोड बातमी; होणार मोठा फायदा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, २६ सप्टेंबर रोजी मुंबईत आकाश ढगाळ राहील आणि त्यादरम्यान शहरात दुपारी किंवा संध्याकाळी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी मुंबईत दुपारी किंवा संध्याकाळी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यानंतर २९ सप्टेंबर रोजी शहरात ढगाळ वातावरण राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मुंबईत 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत आज किमान तापमान २५ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
कांद्याचा भाव वाढणार! शेतकऱ्यांनो व्हा सज्ज; नाफेडने साठवलेला 50 टक्के कांदा खराब
पेट्रोल डिझेलच्या नवीन किमती जाहीर! पेट्रोल फक्त 84 रुपयांना...
Share your comments