1. हवामान

IMD Alert: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा! 24 तासांत या राज्यांमध्ये दिसणार मुसळधार पावसाचा कहर

IMD Alert: देशात मान्सूनचा प्रवास सुरु आहे. तसेच राज्यातही जोरदार मान्सून कोसळत आहे. अक्षरशः काही भागात नद्यांना पूर आला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात खरीप हंगामातील शेतीला सर्वाधिक फटका बसला आहे. येत्या २४ तासांत आणखी मुसळधार पावसाचे सत्र सुरूच राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
Heavy rain maharashtra

Heavy rain maharashtra

IMD Alert: देशात मान्सूनचा (Monsoon) प्रवास सुरु आहे. तसेच राज्यातही जोरदार मान्सून कोसळत आहे. अक्षरशः काही भागात नद्यांना पूर आला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात खरीप हंगामातील शेतीला सर्वाधिक फटका बसला आहे. येत्या २४ तासांत आणखी मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

महाराष्ट्रातील (Maharashtra) विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. तसेच मुंबई, ठाणे या भागात संततधार पावसामुळे सखोल भागात पाणी साचले आहे. तसेच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण निर्माण झाले असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

लवकरच मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ओडिशा, तेलंगणा, उत्तर किनारी आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मराठवाडा, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशात पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे, पश्चिम मध्य प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच आज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो.

Buffalo Farming: महाराष्ट्रातील ही म्हशीची जात देतेय 1005 लिटर दूध; जाणून घ्या खासियत

बंगालच्या उपसागरात कमी दाबामुळे पाऊस पडत आहे

वास्तविक, बंगालचा उपसागर (Bay of Bengal) आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पुढील दोन-तीन भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दिवस यासोबतच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये आजही पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. यासोबतच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! निर्णय झाला, या दराने मिळणार DA

स्कायमेट वेदरने हा अंदाज जारी केला आहे

उत्तर भारत, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, उर्वरित उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्येही पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, गंगेचा पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, किनारी कर्नाटक, केरळचा काही भाग आणि लक्षद्वीपमध्ये पावसाचा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्याला मिळालं कष्टाचं फळ! सोयाबीन रोपाला लागल्या तब्बल 417 शेंगा
सुवर्णसंधी! सोन्याचे दर ७ महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर; जाणून घ्या आजचे दर

English Summary: IMD Alert: In 24 hours heavy rainfall will be seen in these states Published on: 23 September 2022, 08:39 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters